भाव विभोरीतून स्त्रीभावनांवर प्रकाश-सुनीलकुमार लवटे : कवितासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:59 PM2020-06-20T17:59:55+5:302020-06-20T18:01:13+5:30

भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहातून स्त्रियांच्या भावनांवर प्रकाश टाकला असून, त्यांना माणूस म्हणून जगणे बहाल करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

Prakash-Sunilkumar Lavate on Women's Emotions through Bhav Vibhori: Publication of a collection of poems | भाव विभोरीतून स्त्रीभावनांवर प्रकाश-सुनीलकुमार लवटे : कवितासंग्रहाचे प्रकाशन

 डॉ. स्मिता गिरी लिखित भाव विभोरी...कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले.

Next
ठळक मुद्देभाव विभोरीतून स्त्रीभावनांवर प्रकाश-सुनीलकुमार लवटे कवितासंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहातून स्त्रियांच्या भावनांवर प्रकाश टाकला असून, त्यांना माणूस म्हणून जगणे बहाल करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

डॉ. स्मिता गिरी लिखित भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय समाजव्यवस्था पुरुषप्रधान असून यात स्त्रियांना दुय्यम वागवले जाते. त्यामुळे भारतीय स्त्रिया मानसिक दबावाखाली असतात. अशा वेळी त्यांनी सक्षम होणे गरजेचे असून, स्मिता गिरी यांनी लिहिलेली कविता संघर्षवादी भूमिका घेऊन पुरुषी गुलामी नाकारणारी व स्त्रीला माणूस बनवणारी आहे.

यावेळी लेखक विश्वास सुतार, डॉ. संतोष मुडशिंगीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश केसरकर, डॉ. दयानंद ठाणेकर, राजवैभव कांबळे, पंकज खोत, आदी उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. शोभा चाळके यांनी आभार मानले.

 

Web Title: Prakash-Sunilkumar Lavate on Women's Emotions through Bhav Vibhori: Publication of a collection of poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.