आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:49 IST2024-11-27T16:47:54+5:302024-11-27T16:49:08+5:30

खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

Postage stamp in the name of Acharya Shantisagar Maharaj | आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट

आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट

कोल्हापूर : जैन धर्माचे धर्मगुरू आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने पाच रुपयांचे टपाल तिकीट प्रकाशित केले आहे. या संदर्भात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी दि. २ ऑगस्ट २०२० मध्ये कायदा व सुव्यवस्था मंत्री रवीशंकर प्रसाद यांना निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच त्यानंतर माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

प्रथमाचार्य १०८ श्री शांतीसागर महाराज यांचे २०१९-२० हे दीक्षा जन्मशताब्दी वर्ष होते. यानिमित्ताने त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करावे, अशी मागणी जैन समाज तसेच दक्षिण भारत जैन सभेने खासदार माने यांच्याकडे केली होती.

कोल्हापूरचे लक्ष्मीसेन महाराज, नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज, दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी पार्श्वनाथ पाटील, किरण पाटील यांनी यासाठी सातत्याने माने यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र शासनाने हे तिकीट प्रकाशित केले आहे.

Web Title: Postage stamp in the name of Acharya Shantisagar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.