शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

गडहिंग्लजला पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीर, चांगल्या सवयी जोपासा.. देशाला सदृढ बनवा :अजय केणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 5:57 PM

Coronavirus, gadhingalj, kolhapurnews, doctor कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर यासारख्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या चांगल्या सवयी जोपासूया आणि देशाला सदृढ बनवूया, असे आवाहन अ‍ॅस्टर आधार रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय केणी यांनी दिला.

ठळक मुद्देगडहिंग्लजला पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीरचांगल्या सवयी जोपासा.. देशाला सदृढ बनवा :अजय केणी

गडहिंग्लज : कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर यासारख्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या चांगल्या सवयी जोपासूया आणि देशाला सदृढ बनवूया, असे आवाहन अ‍ॅस्टर आधार रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय केणी यांनी दिला.गडहिंग्लज महसूल विभागातर्फे आयोजित पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. डॉ.केणी म्हणाले, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये साथीची दुसरी लाट आली आहे. प्रगत असूनही ही राष्ट्रे हतबल झाली आहेत. भारतातही दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून आपण सतर्क राहिले पाहिजे.यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्यासह आरोग्यसेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तहसिलदार दिनेश पारगे यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आभार मानले.त्यांची काळजी घ्या..पोस्ट कोविड काळात रूग्णांची अधिक काळजी घ्यायला हवी. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर समुपदेशन करायला हवे. नियमित सकस आहार, व्यायाम आणि मानसिक ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांना सहकार्य करावे, असा सल्ला केणींनी यावेळी दिला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टरTahasildarतहसीलदार