कोल्हापूर : प्रचंड मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर राधानगरी तालुक्यातील मालवे गावची सुकन्या पूजा जयसिंग पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, गट ब साठी घेतलेल्या या परीक्षेसाठी २१६ जागा होत्या. मुलाखतीची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयात सुरू होत्या. गुरुवारी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.मालवे हे सुमारे ८०० ते १००० लोकसंख्येचे छोटे गाव असून पूजा पाटील या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जेमतेम वीस गुंठे जमिनीवर शेती करत कुटुंबाने मोठ्या कष्टाने मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. शेतीबरोबरच शेतातील भाजीपाला बाजारात विकून पालकांनी पूजाच्या शिक्षणासाठी पाठबळ दिले. पूजा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मालवे येथे झाले. माध्यमिक शिक्षण कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयात घेतले. पुढे त्यांनी रसायनशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी संपादन केली. ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे पूजा पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळवण्याची प्रेरणा मिळाली आहे.
Web Summary : Pooja Patil, daughter of farmers from Malve village, Radhanagari, achieved success in the MPSC exam, securing the position of Police Sub-Inspector. Despite humble beginnings, her family prioritized education, selling vegetables to support her studies. Her success inspires rural students.
Web Summary : राधानगरी के मालवे गांव की किसान की बेटी पूजा पाटिल ने एमपीएससी परीक्षा में सफलता प्राप्त कर पुलिस उप-निरीक्षक का पद हासिल किया। साधारण पृष्ठभूमि के बावजूद, उनके परिवार ने शिक्षा को प्राथमिकता दी और उनकी पढ़ाई के लिए सब्जियां बेचीं। उनकी सफलता ग्रामीण छात्रों को प्रेरित करती है।