शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पंचगंगेचे प्रदूषण कमी, साधारण प्रदूषित यादीत समावेश; राज्यातील ५४ नद्या दूषित

By संदीप आडनाईक | Updated: October 10, 2025 12:17 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल जाहीर 

संदीप आडनाईककोल्हापूर : राज्यातील ५४ नद्या प्रदूषित असल्याचा अहवाल सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नद्यांच्या स्वच्छतेबाबतच्या या अहवालानुसार नीरा मध्यम प्रदूषित, काेयना, कृष्णा, वेण्णा सर्वसाधारण प्रदूषित, तर उरमोडी आणि पंचगंगा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक नद्यांचा या यादीत समावेश आहे.देशभरातील नद्यांतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 'नॅशनल वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग प्रोगाम' राबवत असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे? यावर पाण्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी मंडळाकडून नद्यांतील पाण्याचे नमुने गोळा करत प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो.असे मोजतात प्रदूषण?नद्यांतील पाण्यांचे नमुने गोळा केले जातात. त्यात फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलॉजिकल, मेटल्स आणि पेस्टीसाइड्सच्या मापदंडाच्या आधारे प्रदूषण ठरवले जाते. पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण गृहित धरले जाते. त्यानुसार नद्यांची श्रेणीनिहाय वर्गवारी केली जाते. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम दिला जातो. धोकादायक प्रदूषित, अत्याधिक प्रदूषित, मध्यम प्रदूषित, सर्वसाधारण प्रदूषित आणि साधारण प्रदूषित असे पाच प्राधान्यक्रम आहेत.

कृष्णा, पंचगंगा प्रदूषितया अहवालात कुरुंदवाड येथे गणपती घाटावर कृष्णा ही सर्वसाधारण प्रदूषित आणि इचलकरंजी परिसरातील शिरदवाड येथे एमआयडीसीत इनटेक वेल येथील पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत असल्यामुळे ही जागा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.

  • मध्यम प्रदूषित : सातारा जिल्ह्यातील सारोळे गावाजवळील सांगवी येथे नीरा नदी
  • सर्वसाधारण प्रदूषित : कऱ्हाड येथे कोयना, सातारा ते कुरुंदवाड मार्गावरील गणपती घाट येथी कृष्णा, महाबळेश्वर ते माहुली मार्गावर कृष्णा
  • साधारण प्रदूषित : इचलकरंजी परिसरातील शिरदवाडजवळ एमआयडीसी इनटेक वेल येथे पंचगंगा, सातारा ते नागठाणे केटीवेअर येथे उरमोडी आणि पोफळीजवळ वशिष्ठी.

मुळात नद्या प्रदूषित होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या प्रदूषित झाल्याच तर त्या प्रवाहित ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्याउलट त्या अडवल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषित घटक तिथेच अडकतात. त्यामुळेच नद्या प्रदूषण वाढत आहे. शासन, प्रशासनासोबत नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही तर पाणी पिण्यायोग्य मिळणार नाही. - डॉ. अनिलराज जगदाळे, जलस्रोत अभ्यासक. 

२०१२ मध्ये इचलकरंजीतील प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २०१५ ते २०२५ पर्यंत कृती कार्यक्रम राबविण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता कमी झाली आहे. - उदय गायकवाड, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Panchganga pollution decreased, 54 rivers polluted in Maharashtra.

Web Summary : Maharashtra's 54 rivers are polluted, Panchganga included. Krishna is generally polluted, according to a report. Industrial waste worsens river pollution. Citizens must act.