शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचगंगे’च्या सत्तेसाठी आज मतदान

By admin | Updated: January 24, 2015 00:08 IST

उद्या मतमोजणी : पाटील गटाचे आठजण बिनविरोध; निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुके आणि बेळगाव जिल्ह्यातील दोन तालुक्यांत १८ हजार सभासद असलेल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उद्या, शनिवारी निवडणुकीचे मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्वांत जुन्या आणि स्वातंत्र्यसेनानी रत्नाप्पाण्णा कुंभार संस्थापक-अध्यक्ष असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: ५५ वर्षांपूर्वी पंचगंगा साखर कारखान्याची स्थापना झाली. संस्थापक रत्नाप्पाण्णा कुंभार हयात असेपर्यंत कारखान्यावर असलेले त्यांचे वर्चस्व, शिरोळ तालुक्यात ५० शेती सिंचन योजनांद्वारे ऊस पिकामुळे हजारो शेतकऱ्यांचे झालेले कल्याण, रत्नाप्पाण्णांचे मंत्रिपद, जिल्ह्याचे राजकीय केंद्र, कुंभार-यड्रावकर संघर्ष, अशा अनेक घडामोडींमुळे ‘पंचगंगा’ नेहमीच प्रसिद्धीच्या वलयात राहिला. मात्र, रत्नाप्पाण्णांच्या अखेरच्या काळात बदललेली राजकीय स्थिती आणि अर्थकारण यामुळे कारखान्याची स्थिती नाजूक झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम अध्यक्ष असताना ती आणखीन खालावली. त्यानंतर पी. एम. पाटील व त्यांच्या सहकारी संचालकांनी कारखाना सावरायचा प्रयत्न केला.परंतु, सन २००८ मध्ये पंचगंगा कारखान्याला असलेली कोट्यवधी रुपयांची विविध देणी पाहता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना कारखाना ‘बीओटी’ तत्त्वावर भाड्याने देण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही. अगदी पी. एम. पाटील यांच्या भाषेत, सभासदांचे मालकत्व आणि रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे अस्तित्व राहण्यासाठी ‘पंचगंगा’ १८ वर्षे भाडेकराराने ‘रेणुका शुगर्स’ला देण्यात आला. कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आता पहिलीच निवडणूक होत आहे. ‘पंचगंगा’च्या संचालकांच्या १४ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष पाटील पॅनेलचे सर्व १४ आणि विरोधी मगदूम पॅनेलचे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ‘ब’ वर्ग संस्था गटात पाटील पॅनेलचे दिलीप महाजन बिनविरोध निवडले गेले आहेत. उर्वरित १३ जागांसाठी मगदूम गटाचे सहाच उमेदवार असल्याने पाटील गटाचे सातजण निवडून आले आहेत, असे मानले जाते. उर्वरित सात जागांसाठी उद्या मतदान होत आहे. मतमोजणी व निकाल रविवारी (दि. २५) आहे. (प्रतिनिधी)