शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सत्ताधाऱ्यांचे राजकारण : चुकून आलेले उपमहापौरही सटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 1:22 AM

भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या कक्षात महाडिक यांची भेट घेतली; परंतु सत्तारूढ आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमास नाहीत हे लक्षात येताच मोहिते यांनी तेथून धूम ठोकली. बोलत-बोलतच ते महापालिका चौकातून निघून गेले. या बहिष्कार नाट्याचीच जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.

ठळक मुद्दे महापालिका विरोधी पक्षनेता कार्यालय प्रवेशावर बहिष्कार

कोल्हापूर : महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालय प्रवेशाच्या कार्यक्रमावर महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बहिष्कार टाकला. हा कार्यक्रम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पडला. या बहिष्कार नाट्यामुळे महापालिका वर्तुळात राजकीय चर्चा सुरू झाली.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांची नुकतीच निवड झाली. कार्यालय अद्ययावत झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित झाला होता.

विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील आले नाहीत. अमल महाडिकही आले नाहीत; त्यामुळे महापौर आजरेकर व धनंजय महाडिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता; परंतु महापौर आजरेकर, सत्ताधारी आघाडीच्या सर्वच पदाधिका-यांनी कार्यक्रमास दांडी मारली. उपमहापौर संजय मोहिते यांनी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या कक्षात महाडिक यांची भेट घेतली; परंतु सत्तारूढ आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमास नाहीत हे लक्षात येताच मोहिते यांनी तेथून धूम ठोकली. बोलत-बोलतच ते महापालिका चौकातून निघून गेले. या बहिष्कार नाट्याचीच जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.

यामुळे घेतला बहिष्काराचा निर्णयगृहराज्यमंत्री सतेज पाटील व धनंजय महाडिक यांचे राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. चंद्रकांत पाटील हेदेखील राजकीय विरोधकच! तरीही या दोघांना महापालिकेतील कार्यक्रमास निमंत्रण दिल्यामुळे विरोधकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा