शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:25 IST

वेळेत मदत झाल्याने जीवदान

कोल्हापूर: येथील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस गौतम कृष्णात काबळे यांनी रविवारी गौतम कांबळे पंचगंगा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचविला. जीवाच्या आकांताने ती हातपाय हलवत तरंगत होती. बघ्यांची गर्दी झाली होती; पण कोणीही पाण्यात उडी मारून तिला बाहेर काढण्याचे धाइस करीत नव्हते. पोलिस गौतम यांनी अंगातील वर्दीनिशी पाण्यात उडी मारून धाडसाने पोहत बुडणाऱ्या त्या महिलेस जीवदान दिले.शहनाज रफिक शेख (वय ३४. रा. जरगनगर, कोल्हापूर, मूळ आपटी ता. पन्हाळा) असे त्या महिलेचे नाव आहे. तिव्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीच्या मागील बाजूच्या नदीपात्रात सकाळी साडेनऊच्या सुमारास एक महिला बुडत होती. ती गटांगळ्या खात तरंगताना काही लोकाना दिसली तेथील नागरिकांनी ११२ नंबरवर संपर्क करून ही माहिती दिली. तातडीने लक्ष्मीपुरीचे पोलिस गौतम कावळे तेथे पोहोचले. त्यावेळी महिला पाण्यात बुडत असल्याचे दिसले. क्षणाचाही विचार न करता गौतम यांनी खिशातील कागद, मोबाईल दुसन्याकडे दिला आणि वर्दीनिशी पाण्यात उडी घेतली. पोहत शहनाज या बुडणान्या महिलेजवळ ते पोहोचले तिला पाण्याच्या काठावर ओढत आणले काठावर आणून १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तिला सीपीआरमध्ये दाखल केले.

तातडीने उपचार झाल्याने तिची प्रकृती सुधारली आहे. त्याची नोंद करवीर पोलिसांमध्ये झाली आहे. ती महिला पाण्यात कशी पडली याचा शोध पोलिस घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Cop Saves Drowning Woman in Panchganga River: Heroic Act

Web Summary : Kolhapur police constable Gautam Kable bravely rescued a woman drowning in the Panchganga River. He jumped into the river, fully clothed, and pulled her to safety. The woman, identified as Shahaj Rafik Sheikh, is now receiving treatment at CPR hospital. Police are investigating how she fell into the river.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस