शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडूनच आपल्या निवृत्त सहकाऱ्यांचा छळ !

By admin | Updated: July 9, 2015 00:58 IST

आडमुठे धोरण : सेवानिवृत्तीनंतरची बिले देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील नऊ सेवानिवृत्त सहायक फौजदारांच्या वेतनातील जादा रकमेच्या वसुलीची लाखो रुपयांची बिले एक महिन्याच्या आत तत्काळ परत करावीत, असा आदेश न्यायालयाने व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे; परंतु पोलीस प्रशासनातील लेखा शाखेच्या वरिष्ठ लिपिकाने हा आदेश धुडकावून लावत बिले देण्यात टाळाटाळ केली आहे. लिपिकाच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्मचारी हताश झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून बिलांची प्रतीक्षा करणारे कर्मचारी प्रशासनाच्या निषेधार्थ पोलीस मुख्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांचा छळ पोलीसच कसा करतात, याचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने जनतेसमोर आले आहे. जिल्हा पोलीस दलातील काही कर्मचारी सुमारे ३५ ते ३८ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पगारामध्ये जादा पगार अदा झाला आहे. त्याची वसुली झाल्याखेरीज त्यांचे निवृत्तिवेतनाचे प्रस्ताव मंजूर होणार नाहीत, असा दम देऊन लाखो रुपयांची वसुली करून त्यांचे निवृत्तिवेतन मंजूर करण्यात आले; परंतु या प्रशासकीय कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेवर डल्ला मारण्याचे काम प्रशासनाने केले. त्यामुळे सुमारे ३८ वर्षे जनतेसाठी प्रदीर्घ सेवा करूनही आपल्या कुटुंबासाठी भविष्यात काही तरतूद करून ठेवावयाच्या आशेवर कर्मचाऱ्यांना पाणी सोडावे लागले. सेवेमध्ये असताना अतिरिक्त पगार अदा झाला, त्याला सर्वस्वी लिपिक वर्ग जबाबदार आहे आणि सेवानिवृत्तीच्या दरम्यान जादा पगार वसूल करणे चुकीचे असल्याने त्यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. त्यावर पोलीस प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात दोन वेळा अपील केले. दोन्हीही दाव्यांमध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत, कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेल्या रकमा त्यांना एक महिन्याच्या आत तत्काळ परत कराव्यात, असे आदेश दिले. यावर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी १ जानेवारी २०१५ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार वसूल केलेली जादा रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना परत करावी, असे आदेश लेखा शाखेच्या वरिष्ठ लिपिकांना दिले. हे दोन्ही आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी कोषागार कार्यालयाकडे चौकशी केली असता अद्यापही त्यांची बिले जमा झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रकरणांत काही त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यास संबंधित लिपिक टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्या दिरंगाईमुळे ही बिले प्रलंबित पडली आहेत. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची बिले गेल्या चार वर्षांपासून शासनाकडे पडून राहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या लिपिकावर कारवाई करून कर्मचाऱ्यांची बिले त्वरित अदा करावीत.न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे कर्मचारी सेवानिवृत्त सहायक फौजदार एस. एस. मस्के, एन. बी. गाडेकर, ए. डी. डोंगरे, ए. बी. गुरखे, बी. बी. पोटे, बी. डी. भोसले, एम. एस. पाटील, व्ही. बी. मिरजे, एन. एस. पाटील, आदींचा यामध्ये समावेश आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बिलांसंदर्भात संबंधित लिपिकाकडे चौकशी करून ती लवकरात लवकर अदा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा,पोलीस अधीक्षक