कासेगावजवळ पोलिसांची ट्रकचालकाला अमानुष मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 14:41 IST2020-04-17T14:13:59+5:302020-04-17T14:41:29+5:30
संतोष ईराप्पा मालगावकर (रा.जागृतीनगर) महेश दत्तात्रय शितोळे ( रा.यळगूड) अशी त्यांची नावे आहेत.

कासेगावजवळ पोलिसांची ट्रकचालकाला अमानुष मारहाण
कोल्हापूर : कासेगाव ( जि. सांगली) येथे चेकपोस्टजवळ पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतून मालवाहतूक करणार्या कोल्हापूरच्या ट्रकचालक व क्लिनरला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. संतोष ईराप्पा मालगावकर (रा.जागृतीनगर) महेश दत्तात्रय शितोळे ( रा.यळगूड) अशी त्यांची नावे आहेत.
मालगावकर व शितोळे हे दोघे जामनगर (गुजरात) येथून पशुखाद्य घेऊन केरळला चालले होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता ते कासेगावजवळ आले असता पोलिसांनी त्यांना अडविले व थेट चलकाला दोन काठ्या मारल्या. यावेळी मालगावकर यांनी का मारता असे विचारले असता पोलिसांनी चावी काढून घेऊन दोघांनाही खाली उतरविले. बाजूला घेऊन मालगावकर याला अमानुष मारहाण केली तर शितोळे हा अपंग असल्याने त्याला दोन काठ्या मारल्या. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेची सर्व कागदपत्रे असताना मारहाण झाल्यांने संताप व्यक्त होत आहे.