शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांची छपाई कोल्हापुरातील राजेंद्रनगरात, सारे प्रयोग झाले देवाभाईच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:40 IST

एका कागदात तीन नोटा; प्रिंटर, कागद, कटर जप्त; रॅकेटचा उलगडा

कोल्हापूर : बनावट नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीने राजेंद्रनगरातील देवाभाई उर्फ मोहन पवार (वय २५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याच्या घरात नोटांची छपाई केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी देवाभाईला अटक केली असून, त्याच्या घरातून प्रिंटर, कागद, कटर जप्त केला. नोटांच्या कलर झेरॉक्स काढून छपाई केल्याची कबुली त्यांनी दिली.राजर्षी शाहू महाराज टर्मिनस परिसरात बनावट नोटांची खरेदी-विक्री करणारे राहुल खिरुगडे आणि गुरू मेंगाणे या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर यांना नोटा पुरवणारा राहुल रसाळ हादेखील पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या चौकशीतून चौथा आरोपी देवाभाई उर्फ मोहन पवार याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी त्याला राजेंद्रनगरातून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वत:च्या घरात दोन महिन्यांपूर्वी दीड लाखांच्या नोटांची छपाई केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या घरातून छपाईचे साहित्य जप्त केले. शहरातूनच त्यांनी कलर प्रिंटर, झेरॉक्सचे कागद, कटर खरेदी केले होते. दीड लाखातील १९ हजार रुपये रसाळ याने खपविण्यासाठी घेतले होते. त्यातील बहुतांश नोटा भिजून खराब झाल्याचे त्याने चौकशीत सांगितले. या टोळीतील चौघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक सागर गुणवरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला.एका कागदात तीन नोटाबनावट नोटांची छपाई करण्यासाठी आरोपींनी खऱ्या नोटांच्या कलर झेरॉक्स तयार केल्या. एफोर साईजच्या एका कागदात तीन नोटांची छपाई केली. नोटांच्या दोन्ही बाजूंची छपाई तंतोतंत यावी यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. मात्र, झेरॉक्स पेपरचा वापर केल्याने त्या खपल्या नाहीत. पाण्यात भिजताच नोटांचा रंग उडाला, असे त्यांनीच पोलिसांना सांगितले.

झटपट श्रीमंतीसाठी बनावट नोटाअटकेतील चौघेही मोलमजुरी करणारे आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी नोटांची छपाई करण्याचा फंडा खिरुगडे आणि मेंगाणे यांच्या डोक्यात आला. देवा भाईच्या मदतीने त्यांनी छपाई केली. मात्र, नोटा खपवण्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले.देवाभाईची दहशतदेवाभाई हा तृतीयपंथी आहे. ओळखीतून त्याची राहुल खिरुगडे याच्याशी मैत्री झाली होती. परिसरात दहशत असल्याने अटकेतील दोघे देवाभाईचे नाव घेण्यास घाबरत होते. तो करणी करेल अशी भीती मित्रांना वाटत होती, असे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake currency printed in Kolhapur, experiments done at Devabhai's house.

Web Summary : A gang printing fake notes in Kolhapur was busted. Police arrested Devabhai and seized printing materials. The group used color Xeroxes, but the notes were easily damaged. Four individuals involved are now in judicial custody.