कोल्हापूर : सांगरुळ (ता. करवीर) येथे रविवारी (दि. २१) रात्री घरी निघालेल्या सराफाला वाटेत अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. संबंधित सराफाच्या जवळच्या नातेवाईकानेच आर्थिक अडचणीमुळे राजस्थानमधून दरोडेखोरांना बोलावून ही लुटमार केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.याप्रकरणी तेजाराम पेराजी माळी (वय ४५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली होती. प्रवीण ओबाराम माळी (२३, सध्या रा. सोमेश्वर गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर, मूळ रा. सिनधरा, ता. जशवंतपुरा, जि. जालोर, राज्य राजस्थान) आणि खुशबू जसराज परमार (३०, रा. भिनमाल, जि. जालोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून ५१ ग्रॅम सोने आणि ११९ ग्रॅम चांदीची लगड, दोन दुचाकी, तीन मोबाइल असा ११ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरोड्यातील इतर पाच आरोपी राजस्थानमध्ये आहेत. त्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक राजस्थानला रवाना होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.प्रवीण माळी हा फिर्यादी तेजाराम यांचा मामेभाऊ आहे. आर्थिक अडचणीमुळे त्याने हा दरोडा टाकण्याचा कट चार महिन्यांपूर्वी रचला. त्यासाठी राजस्थानातील दरोडेखोरांच्या टोळीला बोलावून घेतले. महिनाभर त्यांनी तेजाराम यांची रेकी केली. त्यानंतर २१ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून जाताना सांगरूळमधील स्मशानभूमीजवळ त्यांना अडवले. पिस्तुलाचा धाक दाखवत बाजूच्या शेतात नेले. हातपाय बांधून त्यांच्याकडील दागिने काढून घेतले होते.
दागिने वाटून घेतानाच सापडलेतपासादरम्यान दरोड्यातील दोघे दागिन्यांची वाटणी करण्यासाठी शनिवारी (दि. २८) सायंकाळी रंकाळा येथील पतौडी खणीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून दोघांना अटक केली. दरोड्यातील दागिन्यांची वाटणी करतानाच महिलेसह दोघे पोलिसांच्या हाती लागले.
Web Summary : A jeweler was robbed by relatives facing financial issues, leading to two arrests. The mastermind, along with accomplices from Rajasthan, planned the crime. Police recovered gold, silver, and vehicles worth ₹11 lakh. Five suspects remain at large.
Web Summary : आर्थिक तंगी से जूझ रहे रिश्तेदारों ने कोल्हापुर में एक सराफ को लूटा, जिसके चलते दो गिरफ्तारियां हुईं। राजस्थान के साथियों के साथ मिलकर सरगना ने अपराध की योजना बनाई। पुलिस ने 11 लाख रुपये का सोना, चांदी और वाहन बरामद किए। पांच संदिग्ध अभी भी फरार हैं।