पोलीस तपासणीच्या बहाण्याने वृद्धाला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:56 IST2019-12-19T18:55:24+5:302019-12-19T18:56:45+5:30

पोलीस तपासणी सुरू असल्याची बहाणा करून दोघा भामट्यांनी रविवारी (दि. १५) सकाळी सव्वादहाच्या सुमारास रंकाळा रोडवर एका वृद्धाला लुबाडून त्यांच्याकडून चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन घेऊन पसार झाला. याबाबत दत्तू राऊ पाटील (६५ रा. कोर्ट कॉलनी, शिंगणापूर रोड, चंबुखडी) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

Police investigating robbery robbed old man | पोलीस तपासणीच्या बहाण्याने वृद्धाला लुबाडले

पोलीस तपासणीच्या बहाण्याने वृद्धाला लुबाडले

ठळक मुद्देदोन भामट्यांकडून दोन तोळ्यांचे दागिने लंपासरंकाळा रोडवरील प्रकार

कोल्हापूर : पोलीस तपासणी सुरू असल्याची बहाणा करून दोघा भामट्यांनी रविवारी (दि. १५) सकाळी सव्वादहाच्या सुमारास रंकाळा रोडवर एका वृद्धाला लुबाडून त्यांच्याकडून चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन घेऊन पसार झाला. याबाबत दत्तू राऊ पाटील (६५ रा. कोर्ट कॉलनी, शिंगणापूर रोड, चंबुखडी) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी की, दत्तू पाटील रविवारी भाजी खरेदी करून सायकलवरून घरी परत जात होते. त्या वेळी रंकाळा रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांची सायकल अडविली. पुढे पोलिसांची तपासणी मोहीम सुरू असून तुमच्या हातातील अंगठी आणि सोन्याची चेन रुमालात काढून ठेवा, असे एकाने सांगितले.

मोटारसायकलवरील दुसऱ्या भामट्याने तपासणी सुरू असल्याचे सांगत पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पाटील यांनी दागिने रुमालात ठेवत असताना ते घेऊन हे भामटे पसार झाले. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 

Web Title: Police investigating robbery robbed old man