शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

दगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 2:26 PM

रस्त्त्यावरील दगडात अडकलेल्या दिव्यांग व्यक्तीची पोलिसाने मदत केली.

 - एकनाथ पाटील 

कोल्हापूर - मागे कोणी नाही, दोन्ही पाय निकामे, लाकडी गाड्यावर बसून दोन वेळच्या पोटासाठी भिक्षा मागत रखरखत्या ऊन्हात शहरात फिरायचे, दोन हात हिच त्यांच्या गाड्याची चाके. गजबजलेल्या सीपीआर चौकात सिग्नल सुरु असल्याने ते बाजूच्या खडकाळ रस्त्यावरुन घसपटत निघाले. दगडामध्ये गाड्याचे चाक अडकले. गाडा पुढे सरता सरत नव्हता. घामाघुम झालेल्या दिव्यांगाला काहीच सुचत नव्हते. तो ओरडला दगडात अडकलोय ओ, हाकेच्या अंतरावर उभे असलेले वाहतुक शाखेचे सहायक फौजदार जयवंत कृष्णा गुरव यांच्या कानावर हे शब्द पडले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी त्याचेकडे धाव घेतली. गाड्याची दोरी धरुन त्यांना सहीसलामत चौकातून पुढच्या रस्त्याला सोडले. चेह-यावर स्मितहाष्य आणि नमस्कार करुन दिव्यांग पुढे सरकत गेला. सहायक फौजदार गुरव यांच्या मदतीचे कोल्हापुरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.शहरात भवानी मंडप, गंगावेश दत्त मंदिर, आझाद चौक दत्त मंदिर, ओढ्यावरील गणपती, रंकाळा साई मंदिर परिसरात चाळीसी गाठलेले दिव्यांग भिशा मागत फिरत असतात. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन्ह, वारा, पासून झेलत ते शहरभर आपल्या लाकडी गाड्यावरुन फिरत असतात. या गाड्याची चाके म्हणजे त्यांचे दोन हात. गाड्यावर बसून दोन्ही हातांनी गाडा पुढे ढकलत ते फिरत असतात. रखरखत्या उन्हात ते आजही शहरात फिरताना दिसतात.शनिवारी (दि. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास सीपीआर चौकात वाहनधारकांची गर्दी होती. सिग्नल सुरु होता. याठिकाणी शहर वाहतुक शाखेचे सहायक फौजदार गुरव सेवा बजावत होते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई, हॉर्न वाजवित सुसाट वाहने जात होती. सीपीआर चौकात सिग्नल लागल्याने वाहने थांबलेली. सिग्नल कधी सुटतो याची घाई प्रत्येकाला होती. रस्त्यावर वाहने असल्याने लाकडी गाड्यावरुन टाऊन हॉलच्या दिशेने दसरा चौकाकडे जाणारा दिव्यांगाने आपला गाडा रस्त्याच्या बाजूला घेत तो पुढे येऊ लागला. करवीर पंचायत समितीच्या समोरच दगडामध्ये त्याचा गाडा अडकला. तो पुढे सरकतचं नव्हता. त्याचे प्रयत्न संपले. अंग घामाघुम झाले होते. आजूबाजूचे लोक त्याचेकडे बघत होते. परंतु मदतीला कोणीच पुढे येत नव्हते. तो ओरडला, दगडात अडकलोय ओ, हे शब्द हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरव यांच्या कानावर पडताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याच्या गाडीला बांधलेली दोरी हातामध्ये पकडून गाडा ओढला. चौकाच्या पलिकडे रहदारीमधून त्याला सुखरुप सोडले. रस्त्यावरील नागरिक हे पाहत होते. चौकात थांबलेल्या प्रसाद गवस यांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलीसातील माणुसकीचा ओलावा नागरिकांना दिसून आला आणि गुरव यांचेवर कौतुकाचा वर्षाव झाला.   ‘गुरव मामा’ होणार सेवानिवृत्त सहायक फौजदार जयवंत गुरव यांची ३५ वर्ष सेवा झाली. शांत, मनमिळावू असा त्यांचा स्वभाव, नागरिकांना मदत करणे हीच त्यांच्या कामाची पध्दत. ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. वाहतूक शाखेमध्ये ‘गुरुव मामा’ म्हणून त्यांची ओळख आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र