शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदार सुनेने सासूला पेट्रोल टाकून पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलीस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल ...

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलीस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानूसार पोलिसांनी संशयित पोलीस हवालदार संगीता राजेंद्र वराळे (वय ५१, नेमणूक पोलीस मुख्यालय, रा. कसबा बावडा) यांच्यावर सोमवारी गुन्हा नोंदविला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित या कोल्हापूर पोलीस दलात हवालदार म्हणून पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. फिर्यादी आशालता या संशयितांच्या सासू आहेत. संशयित संगीता व सासू आशालता याच्यात पूर्वीचा कौटुंबीक व संसारीक वाद होता. सोमवारी मध्यरात्री पुन्हा हा वाद उफाळून आला. त्यात संशयित संगीता यांनी सासू आशालता यांना जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावर डिझेल किंवा पेट्रोल टाकून त्यावर पेटलेला कागद टाकून पेटविले. त्यात फिर्यादी सासू आशालता यांच्या तोंडास, मानेस व उजव्या हातापायास गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सासूस अन्य नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फिर्याद दिल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी भेट दिली.