शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठड्याच बनताहेत मृत्यूचा सापळा

By admin | Updated: August 25, 2014 23:12 IST

जीवांची कोंडी : अद्ययावत, सुरक्षित ठेवण्याचे गृहविभागाचे आदेश

एकनाथ पाटील-कोल्हापूर --जिल्ह्णांतील बहुतांश पोलीस ठाण्यांतील कोठड्यांची दुरावस्था झाली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पोलीस कोठडीमध्ये आरोपींच्या मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहविभाग व पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील पोलीस ठाण्यातील कोठड्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्ह्णातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. एखाद्या गुन्ह्णामध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र दहा बाय बारा किंवा बारा बाय वीस रूंदी-लांबीच्या कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोठडीमध्ये रात्री-अपरात्री आरोपींना लघुशंकेसाठी छोटे स्वच्छतागृह आहे. त्याशिवाय ती खोली पूर्णत: मोकळी असते. कोणतीही वस्तू, फॅन यांची सुविधा नसते. कोठडीसमोर चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात केलेला असतो. त्याला कोठडीतील आरोपींच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. परंतु अलीकडच्या काळात पोलीस कोठडीमध्ये आरोपींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन गृहखात्यासह पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व जिल्ह्णांतील पोलीस प्रशासनाला पोलीस ठाण्यातील कोठडी अद्ययावत आहेत की नाही, याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महासंचालकांनी पाठविलेल्या आदेशामध्ये कोठडींची पाहणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. शहरात करवीर, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र कोठडी आहे. राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये १०+१० ची छोटीसी कोठडी आहे तर लक्ष्मीपुरीमध्ये १०+१२ ची कोठडी आहे. करवीर आणि राजारामपुरीच्या कोठड्या मोठ्या आहेत. सर्व कोठडींची दुरवस्था दिसते. आरोपींनी केलेल्या लघुशंकेची दुर्गंधी, झाडलोट नसल्याने या कोठडीमध्ये आरोपींचा जीव कोंडला जात आहे. जिल्ह्णांतील सर्व पोलीस ठाण्यांच्या कोठडींची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन केली जाणार आहे. कोठड्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, (पोलीस अधीक्षक) शौचालय नाहीजिल्ह्णातील बहुतांशी पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींसाठी शौचालय नसल्याचे निदर्शनास आले आहे. अटक केलेल्या आरोपींना बाहेरील सार्वजनिक शौचालयात घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चार आरोपींचा मृत्यू पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आरोपींच्या जिवाला धोका पोहोचेल, अशी कोणतीही वस्तू न ठेवण्याचे आदेश असताना जिल्ह्णांतील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींना झोपण्यासाठी घोंगडे, चादर, बेडशीट दिली जात आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये अरुण पांडव या आरोपीचा कोठडीमध्येच मृत्यू झाला होता. वादग्रस्त वडगाव पोलीस ठाण्यामध्ये चार वर्षांपूर्वी तिघा आरोपींनी पोलीस ठाण्यामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनांची धग अजूनही विझलेली नाही. तोपर्यंत वडगाव पोलिसांच्या मारहाणीत जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अशा गंभीर घटना घडूनही कोल्हापूर पोलीस मात्र बेदखल आहेत. या कोठड्या आरोपींसाठी मृत्यूचा सापळाच बनल्याची भीती व्यक्त केली जात आहे.