शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अंबाबाई दर्शन मंडपासाठी जागेची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:29 PM

श्री अंबाबाई मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी केली. या जागेबाबत शिंदे कुटुंबीयांशी बोलणी करण्यात येणार आहेत. त्यांचा होकार आला तर मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा विनासायास पार पडेल.

ठळक मुद्देअंबाबाई दर्शन मंडपासाठी जागेची केली पाहणीशिंदे सरकारांच्या जागेचा पर्याय : ...तर पहिला टप्पा विनासायास पार

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी केली. या जागेबाबत शिंदे कुटुंबीयांशी बोलणी करण्यात येणार आहेत. त्यांचा होकार आला तर मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा विनासायास पार पडेल.अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी मनपाकडे सात कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ गेटसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यात येणार होता. त्याचे बजेट साडेचार कोटी होते. मात्र, येथे नवी इमारत बांधणे ‘पुरातत्त्व’च्या नियमांविरुद्ध, मंदिर स्थापत्यशैलीला, सौंदर्य व व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही बाधक असल्याने हेरिटेज समिती, आर्किटेक्टस असो.ने विरोध केला. कोल्हापूरकरांनीही त्यावर आक्षेप नोंदविला आहे. हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी फरासखान्याचा पर्याय मांडला होता.गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर माधवी गवंडी, ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास, देवस्थानचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, प्रकाश गवंडी यांनी फरासखान्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याला, प्रांत कार्यालयाला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी करून जागा निश्चित केली. आता या जागेसंदर्भात शिंदे कुटुंबीयांशी चर्चा करण्यात येईल. त्यांचा होकार आला तर आराखड्यात फेरबदल करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.मनकर्णिका कुंड खुला करणारअंबाबाईच्या स्नानाचे पाणी जेथे जाते, त्या महालक्ष्मी उद्यानाखालील मनकर्णिका कुंड पुन्हा खुला करण्याचा ‘देवस्थान’चा मानस आहे. त्यासाठी त्यांनी ही जागा पुन्हा ‘देवस्थान’कडे हस्तांतरित करावी, अशी मागणी केली आहे. त्यास आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. महापालिकेच्या पुढीस सभेत हा विषय चर्चेला आणला जाईल. मनकर्णिका कुंड खुले झाल्यास जमिनीखाली दडलेली पुरातन, पवित्र वास्तू पुन्हा प्रकाशात येईल.योग्य मोबदला देण्याचीही तयारीवापराविना पडून असलेल्या या इमारतीत राजाराम महाराजांच्या काळात प्रेस चालविले जायचे. पुढे ती जागा शिंदे सरकार यांना विकली. आता ही इमारत मिळाल्यास या साडेसहा हजार चौरस फूट जागेत दर्शन मंडप उभा राहू शकतो. त्यासाठी देवस्थान समिती, मनपा योग्य तो मोबदला द्यायला तयार आहे. शिंदे सरकार देवीच्या कार्यासाठी नकार देणार नाहीत, अशी अपेक्षा असून त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर