शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

गृहिणींचे आर्थिक गणित बिघडणार ग्रामीण भागातील चित्र : दूध दराच्या आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:51 PM

गणपती कोळी ।कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात दर वाढून मिळण्याची आशा असली तरी सध्या मात्र अवस्था बिकट झाली आहे.शेतीबरोबर पशूपालन ...

ठळक मुद्देदूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ

गणपती कोळी ।कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात दर वाढून मिळण्याची आशा असली तरी सध्या मात्र अवस्था बिकट झाली आहे.

शेतीबरोबर पशूपालन हा दुय्यम व्यवसाय मानला जात असला तरी ग्रामीण भागात सामान्य व मध्यमवर्गीयांचा दुग्ध उत्पादन हाच मुख्य व्यवसाय बनला आहे. शेतीच्या पिकाच्या उत्पन्नातून आर्थिक उलाढाल पुरुष मंडळी करतात. मात्र, घरचा रोजचा खर्च मुख्यत्वे महिलाच दुधाच्या उत्पन्नातून चालवीत असतात.

ग्रामीण भागात सामान्य व मध्यम वर्गातील कुटुंबात गृहिणीच गायी-म्हशींचा सांभाळ करतात. पुरुष मंडळींचा यामध्ये फारसा हस्तक्षेप नसतो. दर दहा दिवसाला दूध बिल गृहिणींच्या हातात येत असल्याने या पैशातून आठवडी बाजार, मुलांचा शाळेसह इतर किरकोळ खर्च चालविला जातो. त्यामुळे दुधाच्या उत्पन्नावरच घरचा रोजचा चरितार्थ चालतो. गाय दूध अनुदानाच्या प्रश्नावरून गेले तीन दिवस दूध संकलन बंद झाले आहे. जनावरांचा चारा, पशुखाद्यावरील खर्च रोजचा आहेच. मात्र, दुधच स्वीकारले जात नसल्याने उत्पन्न थांबले आहे.

एका म्हशीचे दोन वेळचे मिळून फक्त तीन लिटर दूध झाले तरी दहा दिवसाला १५०० रुपये बिल मिळते. पशुखाद्य व इतर कपात होऊन किमान एक हजार रुपये मिळतात. मात्र, तीन दिवस दूध बंद असल्याने गृहिणींचे आठवड्याच्या खर्चाचे गणित बिघडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चिंताग्रस्त असून, रोजच्या काढलेल्या दुधाला कोण ग्राहक मिळतो का? याच्या शोधात आहेत. एखादा ग्राहक भेटला की दुधाला दुसऱ्या दिवशीही येण्याची विनंती करताना दिसत आहेत. त्यामुळे दूध आंदोलन व त्याचा परिणाम ग्रामीण भागातच तीव्रतेने जाणवत असून, संप एकदा मिटवा, अशी केविलवाणी हाक महिला करीत आहेत. एकूणच दुधाचे आंदोलन त्यावरून होणारे राजकारण चालत असले तरी ग्रामीण भागातील महिलांचे अर्थकारण बिघडत आहे.दुधाची साय विद्यार्थ्यांच्या ओठांवरकुंभोज : दूध बंद आंदोलनादरम्यान दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी जीव टांगणीला लागला असताना दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा दूध उत्पादक अगदी उत्स्फूर्तपणे गोठ्यातून दूध थेट शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आणून देऊ लागले आहेत. एव्हाना घरी दूध पिण्यासाठी टंगळमंगळ करणाºया शाळकरी मुलांना गेले दोन दिवस मसाले दुधाची मेजवानी मिळू लागल्याने शाळेतील पोरं मात्र खूश झाली आहेत...!

गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाढीव दूध दरासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. परिणामी, दूध संघांकडून केले जाणारे ग्रामीण भागातील दूध संकलन बंद आहे. हातकणंगले तालुक्यातील वारणा तसेच पंचगंगाकाठच्या सर्रास गावात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाची भरभराट आहे. प्रत्येक गावातून अंदाजे तीन ते पाच हजार लिटर दूध संकलन होत असते. तथापि आंदोलनामुळे दूध उत्पादकांसमोर दुधाचे करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पर्यायाने छोटे दूध उत्पादक म्हशीचे दूध घरी खवा बनविण्यासाठी तर काहीजण शेजाºयापाजाºयांना वाटत आहेत. गाय दूध उत्पादक मात्र गोठ्यातील ताजे दूध थेट गावातील प्राथमिक शाळेत आणून देत आहेत. काही मोठ्या विद्यार्थी पटाच्या शाळांनी आवाहन करताच यास आणखीन प्रतिसाद मिळत असून, शाळांतील पोषण आहाराबरोबरच मसाले दूध बनवून विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याने विद्यार्थी जाम खूश झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMilk Supplyदूध पुरवठा