एस.टी.मध्ये संबंधित आगाराच्या प्रमुखांचा फोन नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:54 IST2020-02-07T16:52:45+5:302020-02-07T16:54:27+5:30

प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा व त्या विभागप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावा, असे आदेश परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी एस.टी. प्रशासनाला दिले आहेत.

Phone number of the Head of Departments concerned in ST | एस.टी.मध्ये संबंधित आगाराच्या प्रमुखांचा फोन नंबर

एस.टी.मध्ये संबंधित आगाराच्या प्रमुखांचा फोन नंबर

ठळक मुद्देएस.टी.मध्ये संबंधित आगाराच्या प्रमुखांचा फोन नंबरप्रवाशांच्या तक्रारींचे निराकारण तातडीने होणार : परिवहनमंत्री परब

कोल्हापूर : प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा व त्या विभागप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावा, असे आदेश परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी एस.टी. प्रशासनाला दिले आहेत.

मंत्री अ‍ॅड. अनिल परब म्हणाले की, रोज एस.टी.ने सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एस.टी. महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. एस.टी.च्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क साधण्यास अडचणी येत आहेत.

प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांबरोबरच अधिकाऱ्यांनीही प्रवाशांच्या समस्या जाणून त्यांचे तातडीने निरसन करणे महत्त्वाचे आहे.

 

 

Web Title: Phone number of the Head of Departments concerned in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.