शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधितांचा टक्का घटला

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

एड्स रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती मोहिमेला चांगलेच यश

संदीप खवळे - कोल्हापूर --कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाने एड्स रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती मोहिमेला चांगलेच यश येत आहे़ एचआयव्ही तपासणी करण्याची संख्या वाढत असून, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमालीची घट होत आहे़ यावर्षी ४४५०७ व्यक्तींनी एचआयव्हीची तपासणी केलेली असून यापैकी ८२० जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे़ हे प्रमाण १़८ टक्के असून २००९ मध्ये हाच आकडा १० टक्क्यांच्या आसपास होता़ गरोदर महिलांमधील हेच प्रमाण सन २००७ च्या तुलनेत ०़४ वरून ०़१ टक्क्यांवर आले आहे़.देशात १९९२ पासून एड्स नियंत्रणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली़ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका, नगरपालिका रुग्णालयामध्ये एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्रे (आयसीटीसी) येथे एचआयव्हीची मोफत तपासणी तसेच समुपदेशन केले जाते़ एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, संबंधितांच्या जोडीदाराचीही तपासणी केली जाते़ तसेच त्याच्या कुटुंबीयांना योग्य ते मार्गदर्शन करून एच़ आय़ व्ही़ चाचणीचा अहवाल घेऊन ए़ आऱ टी़ सेंटरकडे पाठवले जाते़ या ए़ आऱ टी़ सेंटरमध्ये संबंधित रुग्णाची ए़ आऱ टी़ पूर्वनोंदणी करून त्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाते़ तिथेही या रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात़ तसेच एआरटी ही औषधप्रणाली हयातभर सुरू करावी लागते़ ही औषधप्रणाली सुरू करण्यापूर्वी सी़ डी़ फोर तपासणी आवश्यक असते़ कोल्हापूर जिल्ह्णात सी़ पी़ आऱ हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज व इंदिरा गांधी रुग्णालय, इचलकरंजी येथे ए़ आऱ टी़ सेंटर आहेत़ एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थाएड्स नियंत्रण कार्यक्रमावर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक हा विभाग कार्यरत असून, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमावर देखरेख केली जाते़ माहिती संवाद, एड्स सप्ताह, युवा सप्ताह, पथनाट्ये, कलापथक, व्याख्याने यांच्या माध्यमातून एचआयव्हीबद्दल जनजागृती होते. नेटवर्क आॅॅफ कोल्हापूर पीपल्स लिव्हिंग विथ एच़ आय़ व्ही. या संस्थेकडे ‘विहान’ हा प्रकल्प असून एचआयव्हीबाधित लोकांना समाजप्रवाहात आणण्याचे व त्यांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करते़ याशिवाय एचआयव्हीबाधित गरोदर स्त्रियांच्या अपत्यांना एड्स होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात़ तसेच मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्था, युवा ग्रामीण संस्था गारगोटी या संस्थांच्या माध्यमातून जनजागृती होते.