ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:39 PM2020-04-24T18:39:07+5:302020-04-24T18:41:25+5:30

   कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे.

As people are not listening, there will be a complete lockdown in Pethwadgaon for three days now ... | ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन...

ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन...

Next
ठळक मुद्देवडगाव उद्यापासून तीन दिवस १०० % लॉक डाऊन 

पेठवडगाव  : वडगाव शहर शनिवार (दि.२५) पासून तीन दिवस पूर्ण 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती नगराध्यक्ष मोहनलाल माळी व मुख्याधिकारी सुषमा कोल्हे शिंदे यांनी आज पत्रकारांना दिली.
       वडगाव शहर हे बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. शहराची लोकसंख्या ३० हजार अधिक असून लगतच्या गावात लोकसंख्या मोठी आहे.त्यामुळे शहरात खरेदी साठी गर्दी होते. शहरात लॉकडाऊन कालावधीमध्ये सकाळी किराणा दुकाने सुरू होती. तर भाजीपाला तसेच फळ विक्री फिरून विक्री ठेवण्यात आली आहे. मात्र काही जण बसून विक्री करतात. यावर प्रशासनाने कारवाई बडगा उगारला आहे.
        कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअंतर्गतच शहर आगामी तीन दिवस १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येत आहे.
   तीन दिवस लॉकडाऊनमध्ये
● सकाळी ६ ते ९ या वेळेत  फक्त दुध,वृत्तपत्रे विक्री सुरू राहील.
●भाजीपाला व किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
●औषध दुकाने १२ वाजे पर्यंत सुरू राहतील.

 

Web Title: As people are not listening, there will be a complete lockdown in Pethwadgaon for three days now ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.