शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई लाचप्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापुरामध्ये हॉटेल परमीट रुमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनाम्याकरिता व्यवसाय चालू असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तीन हजाराच्या ...

कोल्हापूर : महापुरामध्ये हॉटेल परमीट रुमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनाम्याकरिता व्यवसाय चालू असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तीन हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले, त्यामुळे आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३ रा. शिवनगर, आंबेवाडी, ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल व परमीट रुम चालवण्यास घेतले आहे. नुकत्याच झालेेल्या महापुरामध्ये या हॉटेलमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद राहिला. महापुरातील नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याने तक्रारदारास व्यवसाय चालू असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक होता. हा दाखला देण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई शिवाजी चौगले याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार पथकाने संबंधित प्रकरणाची दि. २४ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यामध्ये लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. पथकाने ग्रामपंचायतमध्ये सापळा रचला पण कारवाईची शंका आल्याने शिपाई चौगले याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही. पण यापूर्वीच्या पडताळणीत त्याने लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवारी सकाळी शिपाई शिवाजी चौगले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

फोटो नं. २१०९२०२१-कोल-शिवाजी चौगले (आरोपी-एसीबी)

210921\21kol_2_21092021_5.jpg

फोटो नं. २१०९२०२१-कोल-शिवाजी चौगले (आरोपी-एसीबी)