प्रलंबीत प्रश्न तडीस नेणार, तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 05:23 PM2020-01-03T17:23:39+5:302020-01-03T17:32:44+5:30

थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात शुक्रवारी दिली.

The pending question will be resolved, three ministers testified at the historic Dussehra Chowk | प्रलंबीत प्रश्न तडीस नेणार, तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाही

प्रलंबीत प्रश्न तडीस नेणार, तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाही

Next
ठळक मुद्दे तिन्ही मंत्र्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात ग्वाहीपहिल्या सोमवारी ‘जनता दरबार’ घेणार

कोल्हापूर : थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्रीहसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात शुक्रवारी दिली.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय विश्रामगृहात ‘जनता दरबार’ आयोजित करणार असून यामध्ये सामान्य माणसाची शासकीय कार्यालयातील प्रलंबीत प्रश्नांचा निपटारा लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांचे शुक्रवारी कोल्हापूरात आगमन झाले. कावळा नाका येथून मिरवणूकीने दसरा चौकात ’झालेल्या सभेत महापालिकेच्या वतीने महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर तर डॉ. डी. वाय. पाटील गु्रपच्या वतीने संजय डी. पाटील यांच्या हस्ते मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी आभार मानले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, दिनकरराव जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, उपमहापौर संजय मोहिते, मानसिंगराव गायकवाड, जिल्हा परिेषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, विजय देवणे, प्रा. जयंत पाटील, प्रतिमा सतेज पाटील, बाजार समितीचे सभापती दशरथ माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, अ‍ॅड. सुरेश कुराडे यांच्यासह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title: The pending question will be resolved, three ministers testified at the historic Dussehra Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.