शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘जातपडताळणी’ प्रलंबित

By admin | Updated: November 12, 2014 00:39 IST

संथ कामकाज : १४ हजार प्रकरणे निकालात रखडली; कार्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगा

कोल्हापूर : सह्यांच्या प्रक्रियेस होणारा विलंब, अपुरे कर्मचारी अशी स्थिती लक्षात घेता विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणीकडे प्रलंबित असलेली सुमारे १४ हजार प्रकरणे निकालात काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना जातपडताळणीची प्रमाणपत्रे सादरीकरणासाठी ३० नोव्हेंबरची ‘डेडलाईन’ दिली आहे. मात्र, ती उलटणार असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्र, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे.वैद्यकीय, सायन्स, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत. या कार्यालयात अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्याकडून सह्या होण्यास विलंब लागत आहे. सदस्य सचिव गेल्या दोन महिन्यांपासून रजेवर आहेत. संशयित प्रकरणे दक्षता पथकाकडे देण्यात आली आहेत. या पथकाकडून कामांना गती नसल्याचे चित्र आहे. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानीचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. कार्यालयाकडे जातप्रमाणपत्र पडताळणीची दररोज सुमारे दोनशे प्रकरणे दाखल होत आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या रांगा लागत आहेत. दरम्यान, कार्यालयात किती प्रकरणे निकाली आहेत हे जाणण्यासाठी समितीच्या सदस्य सचिव वृषाली शिंदे यांच्या दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)प्रलंबित प्रकरणे अशी...विद्यार्थी : ५ हजारदक्षता पथक : ३ हजारसेवा : ६ हजारइतर : ५००‘एसएमएस’ मिळाल्यावरच या...या कार्यालयाकडे जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव दिल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांत त्याच्या पुढील प्रक्रियेबाबतची माहिती संबंधित व्यक्तीला देण्यासाठी ‘एसएमएस’ची सुविधा गेल्या वर्षभरापासून कार्यान्वित केली आहे. प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यावर अथवा त्यामध्ये त्रुटी राहिल्यास त्याबाबतचा ‘एसएमएस’ पाठविला जातो. तो मिळाल्यानंतरच विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींनी कार्यालयात येणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रमाणपत्र सादरीकरणाची मुदत वाढवाया कार्यालयातील सध्याच्या कामकाजाची स्थिती लक्षात घेता प्रलंबित असणाऱ्या जातपडताळणी प्रमाणपत्रांच्या प्रस्तावांचा निर्णय येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपूर्वी जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी निर्धारित केलेली मुदत रद्द करावी तसेच ३१ जानेवारी २०१५ पर्यंत मुदत वाढवावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव श्वेता परुळेकर हिने पत्रकाद्वारे केली आहे. मुदत वाढविली नाही, तर सर्व विद्यार्थी संघटनांना एकत्रित करून तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशाराही दिला आहे.