शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’चे थकीत मानधन द्या, मगच काम सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : काेरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी काम केले. मात्र, राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी काम केले. मात्र, राज्य शासनाने जाहीर केलेले वाढीव मानधन अद्याप दिलेले नाही. शासनाने आता आमचा अंत पाहू नये, आधी थकीत मानधन द्या, मगच काम सांगा. अशी मागणी करत चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या काळात सर्व्हेक्षण असो अथवा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचे काम असो, प्रत्येक वेळी आशा वर्कर्स यांनी अतिशय चांगले काम केले. या कामासाठी राज्य शासनाने जुलै महिन्यात वाढीव मानधन दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली होती. आशा वर्कर्स यांना तीन हजार तर गट प्रवर्तक १४० रुपये दिले जाणार होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्याप हे मानधन मिळालेले नाही. ‘आशा’ची दिवाळी अंधारातच गेली. कष्टाचे पैसे देणार नसाल तर काम करणार नाही. मात्र आम्हाला कार्यमुक्त करण्याची धमकी दिली जाते, हा अन्याय असून कष्टाचे दाम मागितले म्हणून थेट काढून टाकण्याची भाषा योग्य नसल्याचे नेत्रदिपा पाटील यांनी सांगितले. चार दिवसांत प्रलंबित मानधन दिले नाहीतर सोमवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी ‘सीटू’चे भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, उज्वला पाटील, ज्योती ताकरे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

-राजाराम लोंढे