Maharashtra Vidhan Sabha 2019 : पवार तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:43 IST2019-10-11T14:07:53+5:302019-10-11T14:43:12+5:30
शरद पवार तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पवार तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : शरद पवार तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला.
कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करत बंडखोरांनाही इशारा दिला.
पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल. पण तसे होणार नाही असे सांगून पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीधर्म पाळावाच लागेल असे निक्षून सांगितले. यावेळी भाजप शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर बायकोच्या विरोधातही प्रचार
विरोधी पक्षातून माझी बायको जरी उभारली तरी तिचा प्रचार माझ्याकडून होणार नाही. सकाळी एकत्र चहा घेऊन बाहेर पडू. पण नंतर मात्र दिवसभरात काय झाले याची विचारणाही तिच्याकडे करणार नाही अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांना डोस दिला.