कोल्हापूर : पाटगाव (ता.भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. पाटगाव गावालगत कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांचे वाहन आढळले होते. याचठिकाणी काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही अस्थी सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे बीडमधील मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाली का अशी भीती व्यक्त होत आहे. माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. भुदरगड पोलीस व स्थानिक नागरिक त्यांचा कसून शोध घेत होते. दरम्यानच, पाटगाव गावालगत शेतात त्यांचे वाहन आढळले होते. तर काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही अस्थी आढळल्या होत्या. या अस्थी अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या. मात्र याचाही अहवाल अद्याप मिळाला नाही.दरम्यान, याबाबत लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबीयांनी सोमवारी (दि. ९) दसरा चौकात निदर्शने करून पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान करावा असी विनंती त्यांनी केली आहे. पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटीपोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पिळणकर यांच्या कुटुंबाला दिलं. यावेळी पिळणकर कुटुंबियांनी पुन्हा फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
Web Summary : Former village head from Patgaon, Kolhapur, missing for two months. Vehicle found, remains discovered nearby. SIT formed to investigate the case after family protests.
Web Summary : कोल्हापुर के पाटगाँव के पूर्व सरपंच दो महीने से लापता। वाहन मिला, पास में अवशेष मिले। परिवार के विरोध के बाद मामले की जांच के लिए एसआईटी गठित।