शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे आढळणारे प्रवासी थेट कोविड केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

कोल्हापूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील प्रवाशांची कोविड तपासणी व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी वाहन थांब्यांच्या ठिकाणी तपासणीसाठी पथके ...

कोल्हापूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील प्रवाशांची कोविड तपासणी व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी वाहन थांब्यांच्या ठिकाणी तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्र‌वारी या पथक नियुक्तीचे आदेश काढले. यात वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस व शासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश असून, लक्षणे आढळलेल्या प्रवाशांची थेट जवळच्या कोविड काळजी केंद्रात रवानगी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारे वाहतूकदार व परिवहन मंडळ यांना प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करणे बंधनकारक केेले आहे. या चाचणीसह जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व पार पाडल्या जात आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे.

या आदेशात खासगी बसेसचे थांबे निश्चित करावेत, त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी उतरवू नयेत. वाहतूकदाराने प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी कोविड टेस्टसाठी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांची नेमणूक करावी व तेथे प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करून घ्यावी. त्याचा खर्च प्रवाशांचे किंवा वाहतूकदाराने करायचा आहे, ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळतील, त्यांना जवळच्या कोविड काळजी केंद्र येथे पाठविण्यात यावे. प्रवाशांच्या हातावर बस कंपनी किंवा वाहतूकदार व्यवस्थापकामार्फत १४ दिवस होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात यावा, असे सांगितले आहे.

--

थांब्याची ठिकाणे अशी

- कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, इचलकरंजी-थोरात चौक, भगतसिंग गार्डन, जयसिंगपूर - नटराज हॉटेलसमोर, आजरा - संभाजी चौक, चंदगड - जुना स्टँड समोर.