शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी हीच मोठी डोकेदुखी-उमेदवारांचा शहराशी संवाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:57 IST

संसदेत कितीही चांगले काम केले आणि संसदरत्न पुरस्कार मिळविण्यात यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत तसेच नगरसेवकांत संवाद

ठळक मुद्देनगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांची भूमिका ठरणार महत्त्वाची

कोल्हापूर उत्तर -- भारत चव्हाण

संसदेत कितीही चांगले काम केले आणि संसदरत्न पुरस्कार मिळविण्यात यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कॉँग्रेस, राष्टवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत तसेच नगरसेवकांत संवाद राहिला नसल्याने खासदार धनंजय महाडिक यांना उघड नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. ही नाराजी दूर करण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या निवडणुकीत या मतदार संघाने मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी शहराशी संपर्क ठेवलेला नाही. मात्र तरीही त्यांना पक्षाचा उमेदवार म्हणून शिवसैनिकांची तसेच महाडिकांबद्दलच्या नाराजीची मदत होईल.खासदार धनंजय महाडिक यांच्या आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय शुत्रत्वाचे प्रतिबिंब या निवडणुकीवर उमटले असून, त्याचे पडसाद ‘उत्तर’वर देखील दिसून येतील. ‘राजकीयदृष्ट्या दोघांपैकी एक संपल्याशिवाय आमची दुष्मनी संपणार नाही,’ असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे जुळवून घ्यायचे तर कोणी आणि कोणाशी? हा प्रश्न न सुटणारा आहे. आमदार पाटील यांच्या गटाने कोणाला पाडायचे हे आधीच ठरविले आहे; त्यामुळे ते महाडिक यांना मदत करतील, ही गोष्टच आता अशक्य बनली आहे.

संसदेत चांगले काम केले, प्रलंबित प्रश्न सोडविले, अनेक विकासकामे केली असा दावा महाडिक भाषणांतून करतात. त्यात तथ्यही असेल; परंतु हे करीत असताना त्यांची नाळ शहरातील कार्यकर्त्यांशी जुळली नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिला नाही. कॉँग्रेसची तर त्यांनी दखलच घेतली नाही. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना जशी मदत केली नाही, तसा त्यांनी विरोधही केला नाही. ते पूर्णपणे अलिप्त राहिले. पुढे निवडून आल्यानंतर त्यांनी ‘ताराराणी आघाडी’शी जवळीक साधली. आघाडीच्या नगरसेवकांसह राष्टÑवादीच्या नगरसेवकांना काही प्रमाणात निधी दिला; परंतु कॉँग्रेसच्या नगरसेवकांना पूर्णपणे बेदखल केले. अर्थात कॉँग्रेसचे नगरसेवकसुद्धा निधी मागायला त्यांच्या दारात गेले नाहीत, ही दुसरी बाजूही तितकीच सत्य आहे.‘महाडिक यांना उमेदवारी देऊ नका,’ असे स्पष्टपणे सांगणाऱ्यात आर. के. पोवार, राजू लाटकर पुढे होते; पण पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी आता महाडिक यांना स्वीकारले आहे. कॉँग्रेस कार्यकर्ते, नगरसेवक यांनाही तसे आदेश प्राप्त होतील; पण ते स्वीकारून अंमलबजावणी करतील यावर विश्वास राहणार नाही. प्रचाराच्या व्यासपीठावर कार्यकर्ते दिसतील; पण प्रत्यक्ष ते काम करतील का, हे मात्र सांगता येणार नाही.

महाडिक काका-पुतणे हे मुरब्बी राजकारणी आहेत. राजकारणात ज्यांना काही स्थान नाही, ज्यांचा राजकीय तत्त्वांशी काही संबंध नाही; परंतु जनसामान्यांवर प्रभाव पाडू शकतात अशा कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे आहे. हीच त्यांची जमेची बाजू आहे. संजय मंडलिक ‘नॉट रिचेबल’ असल्याची टीका होत आहे, ग्रामीणचा पगडा तुलनेने अधिक असल्याचे शहराशी तसा त्यांचा संपर्क कमीच आहे. पण, शहरातील कट्टर शिवसैनिकांची ताकद बोनस असेल.कोण कोणाच्या बाजूने राहील...धनंजय महाडिक - आर. के. पोवार, राजेश लाटकर, सत्यजित कदम, प्रल्हाद चव्हाण.संजय मंडलिक - आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले.गतवेळी मिळालेली मतेधनंजय महाडिक - ८२ हजार ५११संजय मंडलिक - ८६ हजार ३९६

 

उद्या : कोल्हापूर दक्षिण 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर