शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्ववादी राजकारणामुळेच पानसरेंचा खून

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

भालचंद्र कांगो : ‘पानसरे यांचा खून का झाला?’ पुस्तकाचे सांगलीत प्रकाशन

सांगली : संपूर्ण जगात सांस्कृतिक दहशतवाद फोफावत असतानाच, भारतात सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तारूढ आहे. संपूर्ण घटनांचा गांभीर्याने विचार केला, तर गोविंदराव पानसरे यांचा खून हा राजकीय वर्चस्ववादातून झाला असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी शनिवारी येथे केला. अ‍ॅड. के. डी. शिंदे लिखित ‘कॉ. पानसरे यांचा खून का झाला... ?’ या पुस्तिकेचे प्रकाशन कांगो यांच्याहस्ते करण्यात आले. प्राचार्य विश्वास सायनाकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कांगो म्हणाले की, दाभोलकर आणि पानसरे यांच्या विचाराने अनेकांना प्रेरणा मिळत होती. यामुळेच त्यांना संपविण्यात आले. या खुनामागे कोण आहे? असा प्रश्न जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा काही घटकांचा विचार करावा लागतो. सध्या सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, त्यांची विचारसरणी काय आहे, हे लक्षात घेतले तर, हा राजकीय खून असल्याचेच दिसते. पानसरेंची हत्या उन्मादातून करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी सरकारचे धोरण वर्चस्ववादाचे आहे, तर महात्मा गांधी आणि विवेकानंद यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मानवतावादाचा होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. मोदी सरकार आल्यापासून ज्या विपरित घटना समाजात घडत होत्या, त्याविरोधात पानसरे हे वैचारिक हल्ला करीत होते. हल्लेखोरांनी केवळ पानसरेंवर हल्ला केला नाही, तर समतेच्या लढ्यावर हल्ला करून पुरोगामी विचारसरणीच संपविण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, बहुजन समाजाच्या भावना भडकावून त्यांना आपल्याकडे वळविणे हेच काहींचे काम आहे. याला रोखणे गरजेचे आहे. याकरिता बहुजन समाजाने लिहिते झाले पाहिजे. त्याचा प्रारंभ ‘या’ पुस्तिकेच्या माध्यमातून झाला आहे.
अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, विचार संपविण्यासाठीच पानसरेंचा खून केला असून, त्यामागील वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठीच पुस्तिकेचे लेखन केले आहे.
प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी, धार्मिक गुलामगिरी लवकर संपविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शंकर पुजारी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल थोरात यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, धनाजी गुरव, अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)


वैचारिक मंथन
कॉ. पानसरे यांनी ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकावर परिसंवाद ठेवला होता. त्यातून वैचारिक मंथन झाले होते. तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभरात पन्नास ठिकाणी असे परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचे कांगो यांनी सांगितले.