शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले ?

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मुश्रीफांचा गौप्यस्फोट : नावे जाहीर करण्यास सरकारचा विरोध; विधीमंडळाच्या अधिवेशनात जाब विचारणार

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे सर्व मारेकरी पोलिसांना सापडले असून त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे केला. खरे मारेकरी कोण आहेत, त्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत, याचा जाब विधीमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याला आंदोलन करत आहेत, त्याचा संदर्भ देत मुश्रीफ म्हणाले की, ‘मला पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या एसआयटीमधील एक अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे. जर खुनी सापडले आहेत तर त्यांची नावे जाहीर करून खुन्यांचा खरा चेहरा उघड करण्यास सरकारला आम्ही भाग पाडू. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आवाज उठविणार, आंदोलन करणार आहोत.’ मुश्रीफ यांनी हा गौप्यस्फोट करताच कार्यक्रमस्थळी पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली. ‘अमर रहे, अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणेने परिसर दणाणून गेला. पानसरे यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि हे स्मारक म्हणजे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, अशी अपेक्षाही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. श्रमिक प्रतिष्ठान हे पानसरे यांचे एक स्वप्न होते, प्रतिष्ठानला जागा मिळावी म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यांचे पुरोगामी विचारांचे कार्य पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना भाकपचे नेते कॉ. भालचंद्र कांगो यांनी केली. पानसरे यांचे खरे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही कांगो यांनी बोलून दाखविला. महापालिकेने पानसरे यांचे स्मारक उभारण्याची केवळ घोषणाच केली नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याचेही धाडस केले, असा गौरवपूर्ण उल्लेख करत पानसरे यांची कन्या स्मिता व स्नुषा मेघा यांनी हे स्मारक नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी स्वागत केले. यावेळी महापौर वैशाली डकरे यांचेही भाषण झाले. उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, माजी आमदार बाबूराव धारवाडे, संपतराव पवार-पाटील, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, डी. बी. पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, नामदेव गावडे, उदय नारकर, राजेश लाटकर, चंद्रकांत घाटगे, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)