पानसरे हत्या प्रकरण ; शरद कळसकरला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:05 IST2019-06-18T13:04:43+5:302019-06-18T13:05:12+5:30
कळसकर याच्याकडून गेल्या सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत

पानसरे हत्या प्रकरण ; शरद कळसकरला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचे समोर हजर केले असता त्यास 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कळसकर याच्याकडून गेल्या सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्याला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनंती तपास अधिकारी तिरूपती काकडे व विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केली न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत कळसकरच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली आहे.
* पोलिसांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे
1) कळसकरचा पानसरे हत्येमध्ये महत्वाचा सहभाग
2) मोबाईल व डायरीचा शोध घ्यायचा आहे. त्याने हा पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले आहे
3) महाराष्ट्राच्या बाहेरील एका मोठ्या शहरात तपासाठी त्याला घेऊन जायचे आहे.
4) पिस्तुल बनवून ते कोल्हापूरात घेऊन कळसकर आला होता.
5) पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती.
6) पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण त्याने इतर साथीदारांसोबत बेळगावमध्ये घेतले.
7) कोल्हापूरातील आणखी एका साथीदाराचा सहभाग आहे. त्याचे वर्णन तो सांगतो; परंतू नाव सांगत नाही. ती व्यक्ती कोण?