शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे-कलबुर्गी हत्या; साम्यस्थळांची घेतली माहिती

By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST

कर्नाटक पोलिसांकडून चौकशी : कोल्हापुरातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते धारवाडमध्ये

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व पुरोगामी कन्नड विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतील साम्यस्थळांची माहिती बुधवारी रात्री कर्नाटकच्या पोलिसांनी घेतली. कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी धारवाडला गेले होते. तिथे धारवाडचे पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांकडे तासभर चौकशी केली. त्यात ‘कम्युनिस्ट’चे दिलीप पोवार, उदय नारकर, एस. बी. पाटील, प्रा. विलास रणसुभे, बाबूराव तारळी व बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर तंबाखे यांचा समावेश आहे. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये साम्यस्थळे आहेत काय याची माहिती घेतली. हे दोघेही एकाच वयाचे होते. मॉर्निंग वॉकवरून परतल्यावर दोघांवर हल्ला झाला. कलबुर्गी यांच्या घरी गेल्यावर मारेकऱ्यांनी दार ठोठावले. त्यावेळी त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्यांना मारेकऱ्यांनी सर आहेत का? असे कन्नडमध्ये विचारले. जसे पानसरे यांना मोरे कुठे राहतात, असे कोल्हापुरी ढंगात विचारले होते. (प्रतिनिधी)प्रत्यक्षदर्शी पुढे येत नाहीत---पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले, असे लोक पोलिसांना नेमकेपणाने माहिती देण्यात पुढे येत नसल्याचा अनुभव दोन्हीकडेही आला. दोन्ही हत्यांनंतर त्याचे सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून समर्थन केले गेले. त्याबद्दल पोलिसांनी काही लोकांना अटकही केली, परंतु चौकशीत फारसे काही निष्पन्न झाले नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आले.