Kolhapur: अंबपमध्ये गव्याचा धुमाकूळ; शाळेत घुसल्याने उडाली तारांबळ, मुख्याध्यापक, क्लार्क जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:51 IST2026-01-17T13:49:06+5:302026-01-17T13:51:50+5:30

मैदानावर विद्यार्थ्यांचे कवायत सुरू असतानाच अचानक शाळेची संरक्षक भिंत तोडून गवा शाळेत शिरला

Panic ensued in Ambap village of Kolhapur when a gaur entered the area | Kolhapur: अंबपमध्ये गव्याचा धुमाकूळ; शाळेत घुसल्याने उडाली तारांबळ, मुख्याध्यापक, क्लार्क जखमी

Kolhapur: अंबपमध्ये गव्याचा धुमाकूळ; शाळेत घुसल्याने उडाली तारांबळ, मुख्याध्यापक, क्लार्क जखमी

नवे पारगाव : अंबप (ता.हातकणंगले) गावात गवा घुसल्याने एकच तारांबळ उडाली. सुमारे एक तास गवा गावात सैरभैर पळत सुटला होता. दरम्यानच गवा शाळेत घुसल्याने एकच धावपळ उडाली. धावपळीत मुख्याध्यापक, क्लार्क किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

आज शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे जिल्हा परिषदेची मराठी शाळा मुलांनी गजबजली होती. विद्यार्थ्यांचे शाळेच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कवायत सुरू होते. अचानक शाळेच्या मैदानात गवा शिरला. शिक्षक विद्यार्थी यांची धावपळ सुरू झाली. धावपळीत विद्यार्थी, शिक्षक किरकोळ जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षकांनी व गावातील प्रमुख नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, गवा अधिकच बिथरला. शाळेच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या हिरवे यांच्या घरावर चढला. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. घराच्या कौलात गवा अडकला व त्याने शेजारीच असलेल्या एका खासगी शाळेच्या अंगणात उडी मारली. बिथरलेला गवा इकडे तिकडे सैरभैर पळत सुटला. ‌अखेर गवा पाडळीच्या दिशेने धावत निघुन गेल्याने अंबपकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

Web Title : कोल्हापुर में तबाही: गौर ने स्कूल में घुसकर कर्मचारियों को किया घायल

Web Summary : कोल्हापुर के अंबप में एक गौर (भारतीय बाइसन) ने स्कूल में घुसकर दहशत मचा दी, जिससे प्रधानाध्यापक और क्लर्क घायल हो गए। जानवर एक घंटे तक घूमता रहा और पाडली की ओर भाग गया, जिससे संपत्ति का नुकसान हुआ और मामूली चोटें आईं।

Web Title : Chaos in Kolhapur: Gaur Enters School, Injures Staff

Web Summary : A gaur (Indian bison) caused panic in Ambap, Kolhapur, entering a school and injuring the headmaster and clerk. The animal roamed for an hour before fleeing towards Padali, damaging property and causing minor injuries.