शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा पर्यटकांसाठी बंद मग राजकीय लोकांनाच प्रवेश का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 18:54 IST

Panhala Tourist Kolhapur : पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देपर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना हातभार लावण्याची मागणी पन्हाळा खुला करण्याची मागणी

पन्हाळा : पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत.गेली काही वर्षे पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब व्यावसाईंकाची कोंडी झाली आहे. आधी पावसामुळे रस्ता बंद झाला, त्यानन्तर सलग दोन वर्षे महापूर आणि त्यांनंतर दोन वर्षे कोरोनामुळे पन्हाळगड बंद आहे. मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी पन्हाळ्यावर जिल्हापरिषद सदस्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ पन्हाळ्यावर येणार आहेत.

यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पन्हाळागडावरील नागरिकांत असंतोष पसरला आहे. यासाठी त्यांनी येथील प्रवासी कर नाक्यावर थांबून बाहेरच्या कुणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.पन्हाळा सर्वांसाठी खुला करा नाहीतर सर्वांनाच बंद करा अशी आग्रही नागरिक करत आहेत. दरम्यान रविवारी येथे येणाऱ्या मंत्र्यांना येथील छोट्या व्यावसायिक तसेच ग्रामस्थामार्फत निवेदन देण्यात येणार असून पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना हातभार लावण्याची तसेच पन्हाळा खुला करण्याची मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरtourismपर्यटनPoliticsराजकारण