शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आलं पाणी, मार्ग बंद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:39 IST

राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४१ʼ२'' फुटावर

कोल्हापूर : शहरात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरुच आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरु असल्याने भोगावती नदीपात्रासह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४१ʼ२'' फुटावर गेली आहे. तर कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पुराचे पाणी येवू लागले आहे. पाणी पातळीत वाढ झाली तर आज हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७१ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी पहाटेपासून दिवसभरही संततधार पाऊस राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गगनबावडा येथील मांडुकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने गगनबावडा ते साळवण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद होण्याची शक्यताकासारी नदीचा उगम शाहूवाडी तालुक्यात होऊन पन्हाळा पश्चिम भागातून मार्ग काढत करवीर प्रयाग येथे मिळते. कासारी नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ सकाळी पाणी आले. पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी पश्चिम बाजूस पावसाचा जोर वाढल्यास नदीची पाणी पातळी वाढून कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद होऊ शकतो. सध्या पाणी पातळी कमी असल्याने वाहतुक सुरू आहे.

राधानगरी धरणातून ८ हजार ५४० क्यूसेकने विसर्गराधानगरी धरणाचे तीन, चार, पाच, सहा, सात हे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामुळे धरणातून ८ हजार ५४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. घटप्रभा, जांबरे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. सर्वच धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.आलमट्टी ७२ टक्के भरलेकर्नाटकातील आलमट्टी धरणात गेल्या चोवीस तासांत ८५ हजार क्यूसेेक पाण्याची आवक होत आहे. धरण ७२.४२ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही तरीही धरणातून एक लाख २५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा : हातकणंगले : १७.५, शिरोळ : २४.४, पन्हाळा : ३६.१, शाहूवाडी : ५७.१, राधानगरी : ४३.३, गगनबावडा :११६.२, करवीर : २०, कागल : १८.६, गडहिंग्लज : २९, भुदरगड : ५५.१, आजरा : ४९.६, चंदगड : ३७.२.प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा :धरण -क्षमता -पाणीसाठाराधानगरी - ८.३० - ८.३६१तुळशी - १.९१- ३.४७१वारणा -२८.९३- ३४.३९९दुधगंगा- १४.९२- २५.३९३कासारी- २.२८-२.७७४घटप्रभा - १.५६- १.५६० 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसhighwayमहामार्गWaterपाणी