शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

महापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:51 IST

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण९२१४ पूरग्रस्तांना साडेचार कोटींचे अनुदान वाटप

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.कोल्हापूर शहराचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान अतिवृष्टी व महापुरामुळे झाले आहे. अनेक कुटुंबांनी या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी शेकडो उद्योजक व व्यावसायिक या नुकसानीतून पुन्हा उभे राहणे अवघड आहे. शहर हद्दीत झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे काम पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी महापालिका, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जलदगतीने आतापर्यंत १० हजार १६० पंचनामे पूर्ण केले आहेत.

अद्याप काही नागरिक घरात पोहोचले नसल्याने पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत. ९२१४ पूरग्रस्तांना चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झाले असून, अद्याप ८०० पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येकांना रोखीने पाच हजार देण्यात आले, तर १0 हजार बॅँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.यापुढे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार असून, त्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांना आयकर विभाग, जीएसटीचे कर्मचारी देण्यात आले आहेत.महापुरामुळे १0 हजारांवर कुटुंबे बाधित झाली असून, सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील १७ उद्योजकांची न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांना कमीत कमी ५0 हजारांपासून ते ३0-४0 लाखांपर्यंत पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील टी. व्ही. फ्रीज, वॉशिंगमशिन, इलेक्ट्रीक उपकरणे, गाद्या, संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.पूर ओसरल्यानंतर महसूल विभागातर्फे शहरातील ८५७९ पूरग्रस्त कुटुंबांना १0 किलो तांदूळ व १0 किलो गहू देण्यात आला, तर सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने ६७७७ पूरग्रस्तांना २३ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. ज्यांची पूर्ण घरे पडली, त्यांना प्रत्येकी ९५ हजार १०० रुपये, तर ज्यांची अंशत: घरे पडली, त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

महापुरात झालेली हानी

  • अंशत: पडलेली घरे-२७५
  •  पूर्णत: पडलेली घरे-४०
  •  पूरबाधित व्यावसायिक दुकानांची संख्या-२२०८
  •  पूरबाधित कारागीरांची संख्या- ४१३
  • पूरबाधित उद्योजकांची संख्या- १७

 

महापुरामुळे शहरातील कुटुंबे, व्यावसायिक, उद्योजक यांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, त्याचे मूल्यांकन सुरू झाले आहे. तातडीची मदत म्हणून पंचनामे करतेवेळी प्रत्येकी पाच हजार रुपये, तसेच धान्यवाटप केले.- संतोष भोर, उपायुक्तपुणे महानगरपालिका

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर