पाकिस्तान पराभवाचा कोल्हापुरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 13:34 IST2021-11-12T13:22:33+5:302021-11-12T13:34:08+5:30

टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने कोल्हापुरात शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण शहर रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले.

Pakistan defeat in Kolhapur | पाकिस्तान पराभवाचा कोल्हापुरात जल्लोष

पाकिस्तान पराभवाचा कोल्हापुरात जल्लोष

ठळक मुद्दे ऑस्ट्रेलियाने केला पाकिस्तानचा पराभव कोल्हापुरात क्रीडा शौकिनांनी केली फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने कोल्हापुरात शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण शहर रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले.


पंधरा दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताचा पराभव केल्याने क्रीडाशौकिनांची घोर निराशा केली होती, पण गुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून त्यांना अंतिम फेरी गाठण्यापासून रोखले. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले. सामना संपताच कोल्हापुरात चौका-चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

काही उत्साही युवकांनी दुचाकीवरून शहरातून फेरी मारत पाक पराभवाबद्दल जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुन्हा जणू दिवाळीचा भास निर्माण झाला होता. या उत्साहातून पाक संघाबाबतचा राग कोल्हापूरकरांनी व्यक्त केला.

Web Title: Pakistan defeat in Kolhapur