चंद्रकांत कित्तुरे -मोबाईलमधील कॅमेराचा ज्याने शोध लावला आहे, त्याचा मला खून करायचा आहे. हा खून मला माफ करावा, अशी विनंती आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची अधूनमधून भुरभुर राहिली. दोन दिवस खडखडीत ऊन पडल्याने बळीराजाची चिंता वाढली असून पावसाने एकदम पाठ फिरवली तर खरीप पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल् ...
कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत महिला चोरट्यांना भाविकांनी रंगेहात पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित रूपा रामु बजंत्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२५, दोघी ...
पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने ...
लक्ष्मीपुरी, कोंबडी बाजार येथील जुना लोखंड बाजारवाल्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हटवू नका, या प्रश्नासाठी आज, सोमवारी दुपारी चार वाजता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना भेटण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला. ...
राज्य सरकारने १५ जुलैपर्यंत गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा १६ जुलैपासून बेमुदत दूध संकलन बंद करण्यात येईल. मुंबईला जाणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून दुधाचा एक थेंबही जाऊ देणार ...
बेळगाव येथील चित्रकार अब्दुल बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनात भारतीय कलेचा छटा दिसून येतात, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे वास्तुविशारद मोहन वायचळ यांनी येथे केले. ते बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ...