डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदक ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मूलभूत सुविधांप्रश्नी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. ...
‘पाण्याचे बॉक्स आहे,’ असे सांगून कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या सावर्डे-पाटणकर (ता. राधानगरी) येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. ही कारवाई बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचून केली. ...
फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायाल ...
उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ सलग दुस-या वर्षी सहविजेता ठरला. ...
पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या गेल्या ४0 वर्षांच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले दादा-कोरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार विनय कोरे यांनी दिवंगत नेते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर यांच्याशी राजक ...
२०१८चा ऊस गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिवर्षीप्रमाणे २७ आॅक्टोबर रोजी १७वी ऊस परिषद घेतलेली आहे. प्रत्येक वर्षी ऊस उत्पादकांसमोर शासनकर्ते एखादा संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आणतातच आणि ऊस उत्पादकांच्या भावनांना चेतावतात. ...