एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढीच्या सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूलवाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. ...
महापूर आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. महापुरात जळणाच्या गंजीसह साहित्य वाहून गेले, चिमण्यांची पडझड झाल्याने हा उद्योग पुरता अडचणीत आला असून, किमान महिनाभर हंगाम लांबणीवर पडणार आहे. ...
फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर ...
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ खाऊ गल्ली परिसरात उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या. ...
जिल्ह्यात छुप्या आणि उघड मार्गाने सावकारकी करणाऱ्यांना ठोका, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून, त्यांचा बीमोड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले; त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सावकारांचे आता १२ वाजणार ...
देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ...
महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मा ...