Yashwant Bhalkar's memorial near Khagoalli Armani | यशवंत भालकर यांचे स्मारक खाऊगल्ली कमानीजवळ
 कोल्हापूर महानगरपालिकेत मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली कै. यशवंत भालकर स्मारक समितीची बैठक झाली.

ठळक मुद्देयशवंत भालकर यांचे स्मारक खाऊगल्ली कमानीजवळमहापालिका बैठकीत निर्णय : तीन महिन्यांत काम पूर्ण करा

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ खाऊ गल्ली परिसरात उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

भालकर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने महापौर गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती सदस्यांची बैठक आज महापौर कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीमध्ये कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना यशवंत भालकर यांचे शिल्प उभे करावयाचे टेंडर प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्याची सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या. तसेच काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, असे सांगितले.

यावेळी प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, आदिल फरास, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रकल्प अभियंता अनुराधा वांडरे, संग्राम भालकर, संदीप भालकर, संदीप जाधव, मिलिंद अष्टेकर, स्वप्ना जाधव भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title: Yashwant Bhalkar's memorial near Khagoalli Armani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.