कोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:41 AM2019-11-06T11:41:50+5:302019-11-06T11:45:31+5:30

महापूर आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. महापुरात जळणाच्या गंजीसह साहित्य वाहून गेले, चिमण्यांची पडझड झाल्याने हा उद्योग पुरता अडचणीत आला असून, किमान महिनाभर हंगाम लांबणीवर पडणार आहे. या सर्वांचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतील गुळाच्या आवकेवर झाला असून, गतवर्षीपेक्षा दोन लाख हजार ६०५ गूळरव्यांनी आवक घटली आहे.

In Kolhapur, the cavernous sparrows are still cold, returning to the rains | कोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका

कोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका गतवर्षीपेक्षा दोन लाख गूळरव्यांची आवक कमी : हंगाम महिनाभर लांबणीवर

राजाराम लोंढे

कोल्हापूर : महापूर आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. महापुरात जळणाच्या गंजीसह साहित्य वाहून गेले, चिमण्यांची पडझड झाल्याने हा उद्योग पुरता अडचणीत आला असून, किमान महिनाभर हंगाम लांबणीवर पडणार आहे. या सर्वांचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतील गुळाच्या आवकेवर झाला असून, गतवर्षीपेक्षा दोन लाख हजार ६०५ गूळरव्यांनी आवक घटली आहे.

‘कोल्हापुरी गुळा’ने सातासमुद्रापार भुरळ पाडली आहे. येथील माती आणि पाण्यातच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव आहे. कोल्हापुरात उत्पादित होणाऱ्या गुळापैकी ९५ टक्के गूळ हा गुजरात बाजारपेठेत जातो; तर उर्वरित गूळ निर्यात होतो.

येथे एक किलोपासून ३० किलोपर्यंतचे रवे, गुळाचे मोदक, वड्या अशा विविध प्रकारांत गुळाचे उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. त्याचबरोबर सेंद्रिय गुळाची निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणत: ६०० गुऱ्हाळघरांच्या माध्यमातून प्रत्येक हंगामात २५ लाख गूळरव्यांचे उत्पादन येथे होते.

यंदा महापुरामुळे नदीकाठावरील ऊस संपला आहे. उर्वरित उसाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने, वाढ खुंटल्याने उसाचे उत्पादन घटणार आहे. त्यातच महापुरात गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान झाले. गुऱ्हाळाच्या चिमण्यांची पडझड झाली. साहित्यासह जळणाच्या गंज्या वाहून गेल्या. त्यामुळे हंगाम कसा सुरू करायचा, असा प्रश्न गुऱ्हाळमालकांसमोर होता. त्यातून हंगाम सुरू करण्यासाठी धडपड सुरू असतानाच परतीच्या पावसाने आणखी पेच निर्माण केला.

त्यामुळे सध्या कशीबशी २५ गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली; पण तीही दबकतच सुरू आहेत. कोल्हापूर बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी तीन लाख गूळरव्यांची आवक होते.

गतवर्षी ३ नोव्हेंबरपर्यंत तीन लाख ५७ हजार ३६० गूळरव्यांची आवक झाली होती. यंदा केवळ एक लाख ४८ हजार ७५५ म्हणजे गतवर्षीपेक्षा दोन लाख आठ हजार ६०५ रव्यांनी आवक कमी झाली आहे.

गुजरातमध्ये गुळाची चणचण भासणार!

गुजरातमध्ये नवीन हंगाम सुरू होईपर्यंत हा गूळ कोल्ड स्टोअरेजला ठेवून विक्री केला जातो. आॅक्टोबरला नवीन गूळ येतो; पण यंदा महिनाभर हंगाम लांबल्याने कोल्ड स्टोअरेजमधील गूळ संपला आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातमध्ये गुळाची चणचण भासण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सांगलीतील आवक मंदावली!

सांगलीतही गुळाचे उत्पादन होते; पण तिथे अगोदर महापुराने आणि आता परतीच्या पावसाने गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने सांगली बाजार समितीतील आवक मंदावली आहे. येथे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गूळ येतो.

मागील पाच वर्षांतील कोल्हापुरातील गुळाची आवक व सरासरी प्रतिक्विंटलचा दर असा

एप्रिल ते ३ नोव्हेंबर    आवक           सरासरी दर
२०१५                        १,८९,४९०          २७००
२०१६                        २,२२,८२०         ३४००
२०१७                        ३,००,३०७         ३७००
२०१८                        ३,५७,३६०         ३२००
२०१९                        १,४८,७५५         ३४००


साधारणत: २५ सप्टेंबरपासून गुळाचा हंगाम सुरू होतो; पण यंदा अद्याप गती आलेली नाही. आवक मंदावली आणि गुजरातमध्ये मागणी वाढली आहे. मागील वर्षापेक्षा सध्या दरात प्रतिक्विंटल ६०० रुपयांची वाढ दिसत आहे.
- बाळासाहेब मनाडे,
गूळ अडत दुकानदार

 

Web Title: In Kolhapur, the cavernous sparrows are still cold, returning to the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.