कोल्हापूर शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळल्याची बाब समोर येत असल्यामुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता घराघरांत पाणीसाठ्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडण ...
जरगनगर येथे गुरुवारी ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि वुशू असोसिएशन आॅफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे ‘ताई-ची’ योग विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत ही कार्यशाळा झाली. ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे ...
शेतकरी सहकारी संघाच्या पोटनियम दुरुस्तीनंतर ज्यांनी ५०० रुपये भाग भांडवलाची पूर्तता वेळेत केली, ते क्रियाशील सभासद झाले. ज्यांनी ही पूर्तता केली नाही, त्यांचे सभासदत्व रद्द केलेले नसून, ते ‘अक्रियाशील सभासद’ आहेत. अजूनही ज्यांना पूर्तता करायची आहे, त ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. मंगळवार (दि. १९) सकाळी ११.३0 वाजता अध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. याबाबतचे पत्र दुपारीच व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषदेत नव्या आरक्षणाचीच चर्चा सुरू झाली ...
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अनपेक्षितपणे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी ) व भाग्यश्री शेटके (भाजप) यांच्यात महापौरपदासाठी, तर संजय मोहिते (कॉँग्रेस) ...
दोन वेळा धनादेश काढूनही कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना ते न देणारे कनिष्ठ लिपिक बाबूराव कात्रे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका चौकशीमध्ये ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून, आज, शनिवारी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोट ...
आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या लघुपट व माय मराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यासाठी संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. ...
श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग प ...
मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. ...
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबवित असताना ज्या भागात रस्ते केले जाणार आहेत, तेथील सेवावाहिन्या उदा. पाणीपुरवठा जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, टेलिफोन केबल, आदी रस्त्यांखालीच न ठेवता त्या स्थलांतर करणे आवश्यक होते; परंतु सेवावाहिन्या स्थलांतराचा अत्यंत मोघम ...