'Tai-Chi' Yoga Workshop at Chikode Library | चिकोडे ग्रंथालयामध्ये ‘ताई-ची’ योग कार्यशाळा
जरगनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये गुरुवारी ‘ताई-ची’ योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देचिकोडे ग्रंथालयामध्ये ‘ताई-ची’ योग कार्यशाळा

कोल्हापूर : जरगनगर येथे गुरुवारी ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि वुशू असोसिएशन आॅफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे ‘ताई-ची’ योग विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत ही कार्यशाळा झाली.
ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योग्य आहाराच्या अभावामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे; त्यामुळे योग, योग्य आहारविहार यांची सांगड घालण्याची गरज आहे.

वुशू संघटनेचे उपाध्यक्ष व ‘ताई-ची’ प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांनी ‘ताई-ची’ ही नवी संकल्पना, त्याचा उगम कोठे झाला, फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक आणि योग आहारतज्ज्ञ पूजा पवार यांनी महिलांना सहज आणि सोप्या पद्धतीने ‘ताई-ची’ योग प्रकार समजावून सांगितला.

योगेश चिकोडे यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णात आतवाडकर, सागर पाटील, जयदीप मोरे, मधुरिमा चिकोडे, पूजा कुलकर्णी, सुमित पाटील, जितेंद्र बामणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच यावेळी सम्राज्ञी कुलकर्णी, भाग्यश्री पाटील, रेवती पाटील, संकेत पाटील, निखील मोरे, आकाश माडगूळकर, अक्षय पवार, अनिल शिंदे, इत्यादी साहाय्यक प्रशिक्षक उपस्थित होते.

 

 

Web Title: 'Tai-Chi' Yoga Workshop at Chikode Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.