८० वर्षांचे एक ज्येष्ठ गृहस्थ अशा पद्धतीने आडवे आले की त्यांना वाचविण्यासाठी याला रस्ता दुभाजकावर गाडी घालावी लागली. त्याच्या डोक्याला खोक पडली. १५ दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. तो बरा होऊन घरी आला. सगळ्यांनी डोक्याला फार काही झालं नाही म्हणून ...
महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होत ...
राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेतही द्वितीय, तृतीय असा क्रमांक पटकावून संघाच्या कामगिरीत मोलाची मदत केली. इंदोर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेतही शिवाजी विद्यापीठाच्या बेसबॉल संघाकडून खेळताना ती चमकली आहे. अनेक स्पर्धेतील चमक दार कामगिरीची दखल घेत क ...
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण ...
छत्रपती घराण्याच्या वतीने बुधवारी टाऊन हॉल उद्याननजीक नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहू छत्रपती आणि यौवराज यशराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ उत्सव साजरा करण्य ...
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रम कमी होणे, हालचालींचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर ...
दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा ...