पी. एन. यांच्या फंडातून खुपिरे रुग्णालयासाठी रुग्णवाहिका; वीस वर्षांचा प्रश्न निकाली : कोरोनाच्या काळात होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:15+5:302021-04-14T04:22:15+5:30

कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षांचा रुग्णवाहिका प्रश्न प्रलंबित निकाली निघाला. जनतेच्या मागणीनुसार ...

P. N. Ambulance for Khupire Hospital from his fund; Twenty-year-old question resolved: Coronation will help | पी. एन. यांच्या फंडातून खुपिरे रुग्णालयासाठी रुग्णवाहिका; वीस वर्षांचा प्रश्न निकाली : कोरोनाच्या काळात होणार मदत

पी. एन. यांच्या फंडातून खुपिरे रुग्णालयासाठी रुग्णवाहिका; वीस वर्षांचा प्रश्न निकाली : कोरोनाच्या काळात होणार मदत

Next

कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षांचा रुग्णवाहिका प्रश्न प्रलंबित निकाली निघाला. जनतेच्या मागणीनुसार आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून रुग्णवाहिकेसाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला व प्रत्यक्ष रुग्णवाहिकेचे लोकार्पणही झाले. सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या रुग्णवाहिकेचा जनतेला लाभ होईल, असे आमदार पी. एन. पाटील यांनी यावेळी केले. अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली जांभळे होत्या.

आमदार पाटील म्हणाले, खुपिरेसह करवीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोना काळात जनतेला जलद आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मतदारसंघात दोन ठिकाणी रुग्णवाहिका दिल्या आहेत. कोरानाचे रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी स्वतः सह कुटुंबाची काळजी घ्यावी, सरकार जनतेच्या पाठीशी आहे.

कुंभी-कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी गावामध्ये पेयजल योजनेचे काम जनतेच्या विश्वासास पात्र राहून पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणी आम्ही देणार आहोत आणि या कामाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन घेणार आहोत, असे सांगितले.

कुंभी-कासारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील यांचे मनोगत झाले. सरदार बंगे व माजी सरपंच प्रकाश चौगले, जिल्हा शल्यचिकीत्सक ए. डी. माळी, वैद्यकीय अधीक्षक एस. बी. थोरात, हिंदुराव पाटील, सनी पाटील, उपसरपंच युवराज पाटील, रणजित पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, तानाजी गवळी, हिंदुराव माळवले, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो १३०४२०२१-कोल-पीएन पाटील न्यूज

खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून रुग्णवाहिकेसाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला व प्रत्यक्ष रुग्णवाहिकेचे लोकार्पणही आमदार पाटील व स्थानिक मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत झाले.

Web Title: P. N. Ambulance for Khupire Hospital from his fund; Twenty-year-old question resolved: Coronation will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.