शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्रकल्प हे दातृत्वाचे प्रतीक :चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:57 IST

Oxygen Cylinder Bjp Kolhapur  : अतिशय अल्पावधीत सिध्दगिरी रूग्णालयामध्ये उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा दातृत्वाचे उत्तम असे प्रतीक आहे असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले. यावेळी पाटील यांच्या आवाहनानुसार १०० सिलिंडरसाठीही पाच लाखांची देणगी जमा झाली.

ठळक मुद्देऑक्सिजन प्रकल्प हे दातृत्वाचे प्रतीक :चंद्रकांत पाटीलकणेरी मठावर लोकार्पण कार्यक्रम

कोल्हापूर  : अतिशय अल्पावधीत सिध्दगिरी रूग्णालयामध्ये उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा दातृत्वाचे उत्तम असे प्रतीक आहे असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले. यावेळी पाटील यांच्या आवाहनानुसार १०० सिलिंडरसाठीही पाच लाखांची देणगी जमा झाली.कणेरी मठावर शनिवारी झालेल्या ऑक्सिजन प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गांधीनगरचे व्यापारी शंकर दुल्हाणी प्रमुख उपस्थित होते.कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ लागले. हीच गरज ओळखून चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धगिरी कणेरी मठावर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी देणगीचे आवाहन केले. त्याला लगेचच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

४३ लाख रूपये संकलित झाले आणि या लोकसहभागातून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र येथे तब्बल ५३ लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला.पाटील म्हणाले, कोरोनामुळे आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तात्पुरती सोय करण्याऐवजी वाढदिवसाच्या निमित्ताने हा संकल्प जाहीर केला आणि नागरिकांच्या दानशूरतेने तो तातडीने तडीसही गेला.

स्वामी काडसिध्देश्वर म्हणाले, त्याग आणि दान हे याला अतिशय महत्व आहे. पाटील यांनी यांनी त्यांच्या आयुष्यात या दोन घटकांना अधिक महत्व दिले आहे. त्यातून समाजाची सेवा होणार आहे. डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रेषम राजपूत यांनी आभार मानले.यावेळी या प्रकल्पाला सहकार्य करणारे श्यामसुंदर मर्दा, सुरेंद्र जैन, ललित गांधी, विनोद कंकाणी, अमित भिडे, माधवराव घाटगे, डॉ. प्रकाश गुणे, बंटी भांगडिया, विठ्ठलराव खोराटे, आप्पासाहेब मोहिते, सुनिल राजाराम अस्वले, रविंद्र कागवाडे, राहुल पाटील व आनंद पाटील -मुंबई, शेखर चरेगावकर, डॉ. रोंगे- पंढरपूर, भावेश पटेल, नरेश चंदवाणी, माणिक पाटील चुयेकर, प्रा. भारत खराटे, भाजपाचे जिल्हा संघटन सचिव नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनBJPभाजपाkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील