शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड केंद्रातील सुविधांवर भर दिला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड केंद्रातील सुविधांवर भर दिला असून या अंतर्गत गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात रोज १५० नग जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उत्पादन करणारा ऑक्सिजन जनरेटर बसविण्यात आला आहे. पुणे विभागात ही पहिली सुविधा असू शकते. यामुळे गडहिंग्लज, चंदगड, भुदरगडमधील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.

जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ऑक्सिजन जनरेटर खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन उत्पादन करणारे ऑक्सिजन जनरेटर तातडीने बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड यांना दिल्या होत्या. या कामासाठी ऑक्झायर, चेन्नई या कंपनीने तयार केलेले १५० जम्बो सिलिंडर (१०५०m३) क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन प्रती दिवस करणारे उपकरण तयार करून २३ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे पुरवठा करण्यात आले.

उपकरणाची उभारणी व कार्यान्वितीकरण पूर्ण झाले असून शुक्रवारी (दि. ४) या उपकरणांची चाचणी करण्यात आली. तसेच याद्वारे उत्पादित ऑक्सिजन सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन पाईपलाईनशी जोडण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता विलास गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता सुभाष बागेवाडी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, कंत्राटदार संजय आडगावकर, डॉ. चंद्रकांत खोत, ऑक्झायर कंपनी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

----

गडहिंग्लजला आता ऑक्सिजनसाठी पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागणार नाही. येथेच ऑक्सिजन निर्माण होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती आणि खासगी पुरवठादार अशा दुर्गम भागात जाण्यास तयार नव्हते. आता मात्र रुग्णांची मोठी सोय झाली आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई

----

फोटो नं ०८१२२०२०-कोल-गडहिंग्लज ऑक्सिजन०१,०२

ओळ : कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे जम्बो कोविड केंद्रातील सुविधाअंतर्गत गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात रोज १५० नग जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उत्पादन करणारा ऑक्सिजन जनरेटर मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला.