इचलकरंजी : केंद्र सरकारकडुन ७० वर्षे शहरांच्या विकासासाठी निधी येत नव्हता मात्र आता मोदी सरकारकडुन विविध योजनांच्या माध्यमातून शहरांना निधी दिला जात आहे. त्यातूनच विकास होताना दिसत आहे. भविष्यातही सरकारकडुन निधी येईल पण येणार्या निधीचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे. तो चुकीच्या हातात पडला तर भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल, असे टीकास्त्र मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोडले. तसेच इचलकरंजी महापालिका निवडणुकीत तुम्ही आमची काळजी घ्या पुढे ५ वर्षे आम्ही तुमची काळजी घेतो, असे आवाहनही त्यांनी केले.इचलकरंजी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभानिमित्त झालेल्या विजयी संकल्प यात्रेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजर्षी शाहु पुतळ्यापासून या यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर एका जीपमध्ये तर महायुतीचे सर्व उमेदवार एका टेम्पोत होते. जनसमुदाया सोबत मुख्यमार्गावरून ही यात्रा शिवतीर्थमार्गे महात्मा गांधी पुतळा चौकात पोहचल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वाचा : भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहातीफडणवीस म्हणाले, इचलकरंजीतील घराघरात नळाने पाणी देऊन शहराचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत. रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्यासह विविध कामांसाठी निधी दिला आहे. या पुढेही दिला जाईल. शहराच्या सर्वांगिण विकासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशिल आहे. आम्ही ही निवडणुक, केलेल्या विकास कामाच्या जोरावरच लढवत आहोत. भविष्यातील शहरी विकासाचा आराखडा तयार आहे. तो घेऊनच आम्ही या महानगरपालिका निवडणूकांना सामोरे जात आहोत. त्यासाठी आम्हाला साथ द्या. असे आवाहन केले.
वाचा : 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोपपरिसर भगवामय भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ यामुळे संपूर्ण परिसर भगवामय होऊन गेला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, झांजपथकाचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मुख्य मार्गावरुन ही रॅली निघाली. श्री शिवतीर्थ आणि श्री शंभुतीर्थ याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
Web Summary : Devendra Fadnavis urged Ichalkaranji voters to support the ruling coalition, promising development funds. He cautioned that electing the opposition would lead to corruption and misuse of funds. He pledged to solve the water issue and boost development if they win.
Web Summary : देवेंद्र फडणवीस ने इचलकरंजी के मतदाताओं से सत्तारूढ़ गठबंधन का समर्थन करने का आग्रह किया और विकास निधि का वादा किया। उन्होंने विपक्ष को चुनने पर भ्रष्टाचार और धन के दुरुपयोग की चेतावनी दी। उन्होंने जीतने पर पानी की समस्या को हल करने और विकास को बढ़ावा देने का संकल्प लिया।